शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: 'मोदींना मी एकटाच भेटलो नाही', शरद पवारांनी थेट पत्रकार परिषद घेऊन सांगितलं भेटीचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 16:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दिल्लीत झालेल्या बैठकीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

नवी दिल्ली-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दिल्लीत झालेल्या बैठकीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. "पंतप्रधान मोदींना मी एकटा भेटलेलो नाही. आमचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पी.पी. देखील भेटीवेळी उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधानांसमोर लक्षद्वीपमध्ये नागरिकांचा प्रशासकाविरोधात सुरू असलेल्या रोषाची माहिती दिली. मी फक्त सोबत उपस्थित होतो. तसंच मीही दोन मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींचं लक्ष वेधलं", अशी माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. 

लक्षद्वीपमध्ये प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्याकडून लक्षद्वीपमध्ये केल्या जाणाऱ्या विकास कामांविरोधात स्थानिक नागरिकांचा रोष असून गेल्या १५ महिन्यांपासून याबाबत नागरिक निषेध व्यक्त करत आहेत. तसंच प्रशासक प्रफुल्ल पटेल यांना हटविण्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे लक्षद्वीपमधील खासदार मोहम्मद फैजल पी.पी यांनी पत्रकार परिषदेत दिली. "लक्षद्वीपमध्ये प्रशासक प्रफुल पटेल आल्यापासून सुरु असलेल्या गैरकारभाराची माहिती मी वेळोवेळी आमचे अध्यक्ष शरद पवार यांना देत आलो आहे. याच प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करावी अशी विनंती मी शरद पवार यांना केली होती. त्यानुसार आज आमची पंतप्रधानांसोबत भेट झाली. पंतप्रधानांनी आमचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्हाला आशा आहे की ते सकारात्मक प्रतिसाद देतील", असं मोहम्मद फैजल पी.पी म्हणाले. 

शरद पवारांनी काय म्हणाले?"पंतप्रधानांसोबत मी एकटा उपस्थित नव्हतो. मोहम्मद फैजल देखील उपस्थित होते आणि त्यांनी जी आता माहिती दिली. तिच त्यांनी स्वत: पंतप्रधानांना सांगितली. मी फक्त तिथं उपस्थित होतो. मीही दोन मुद्दे पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिले आहेत. यात महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्नाबाबत त्यांच्याशी बोललो आहे. अजूनही त्या आमदारांची नियुक्ती झालेली नाही हे त्यांच्या लक्षात आणून दिलं. तर दुसरं म्हणजे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर काल झालेल्या कारवाईचीही माहिती पंतप्रधानांना दिली", असं शरद पवार म्हणाले. 

"संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि एका वृत्तपत्राचे संपादक आहेत. त्यांच्यावर कारवाई कोणत्या उद्देशानं केली. एका खासदारावर अशी कारवाई करण्यात आली आहे. त्याचं राहतं घर जप्त करण्यात आलं आहे. केंद्रीय यंत्रणांकडून ही कारवाई करण्यात आल्यानं त्याची माहिती पंतप्रधानांना दिली आहे", असं शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी