शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार दिल्लीत पुन्हा चर्चेत

By admin | Updated: July 22, 2016 03:42 IST

ज्येष्ठ संसदपटू शरद पवार दोन कारणांमुळे या आठवड्यात प्रसिद्धीच्या झोतात राहिले.

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- ज्येष्ठ संसदपटू शरद पवार दोन कारणांमुळे या आठवड्यात प्रसिद्धीच्या झोतात राहिले. बिहारचे मुख्यमंत्री व जनता दलाचे (यू) अध्यक्ष नितीशकुमार बुधवारी स्नेहभोजनासाठी पवारांच्या निवासस्थानी गेल्यामुळे येथे चर्चेला उधाण आले असतानाच माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे (एस) नेते एच.डी. देवेगौडाही त्यांच्यात सहभागी झाल्याने हे जेवण अधिक रुचकर बनले. या तिघांमध्ये काय चर्चा झाली हे लगेचच समजू शकले नाही. निवडणूक होत असलेल्या राज्यांमध्ये भाजपला नामोहरम करणे आणि आगामी लोकसभा निवडणुकीत रालोआला एकत्रित सामोरे जाण्याच्या व्यूहरचनेबाबत या त्रिकुटात ९० मिनिटे खल झाला. समविचारी पक्षांची मोट बांधण्याच्या मोहिमेवर असलेले नितीशकुमार तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा करीत असून, शरद पवार या मोहिमेला पुढे नेण्यासाठी मध्यस्थ म्हणून भूमिका बजावत आहेत. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी सभोवती काय घडते आहे याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांपैकी नाहीत. आज त्यांनी राज्यसभेत पवारांच्या आसनापर्यंत जाऊन त्यांच्याशी कानगोष्टी केल्या. प्रश्नोत्तराच्या तासानंतर संसद सदस्य भोजनासाठी बाहेर पडत असतानाच मोदी आपल्या जागेवरून उठले आणि विरोधी बाकांकडे केले. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांच्याशी हस्तांदोलन करीत ते पवारांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्याशी अल्पकाळ चर्चा केली.