शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रोस्टरचा अधिकार सरन्यायाधीशांचाच, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, शांती भूषण यांची याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 04:10 IST

सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश समान असले तरी सरन्यायाधीश ज्येष्ठ व समानातही प्रथम पहिले म्हणजेच ‘फर्स्ट अमंग द इक्वल्स’ असतात.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश समान असले तरी सरन्यायाधीश ज्येष्ठ व समानातही प्रथम पहिले म्हणजेच ‘फर्स्ट अमंग द इक्वल्स’ असतात. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणे कोणत्या न्यायाधीशाकडे सोपवावीत आणि कोणत्या न्यायाधीशाची खंडपीठे कधी तयार करावीत, हा अधिकार त्यांचाच आहे. तो अधिकार न्यायवृंद म्हणजे कॉलेजियमला देण्याची गरज नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.प्रकरणे न्यायाधीशांकडे सोपविणे व पीठे तयार करणे याचे रोस्टर एकट्या सरन्यायाधीशांनी तयार करण्याच्या पद्धतीला आव्हान देत, ते कॉलेजियममार्फत व्हावे, अशी याचिका ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व माजी केंद्रीय कायदामंत्री शांती भूषण यांनी केली होती.ती फेटाळताना न्या. ए. के सिक्री व न्या. अशोक भूषण यांनी म्हटले की सर्वोच्च न्यायालयाच्या प्रॅक्टिस अँड प्रोसिजर (२0१७) नुसार खटल्यांचे वाटप, वर्गीकरण (रोस्टर) हे काम सरन्यायाधीशांच्या मार्गदर्शनानुसार रजिस्ट्रार करतात.प्रसंगी त्यात सरन्यायाधीश बदलही करू शकतात. समानातील पहिले व ज्येष्ठ या नात्याने त्यांचा हा अधिकार आहे. तो लिखित स्वरूपात नसला तरी सर्वमान्य आहे. त्याता बदल करण्याचे कारण नाही.चर्चा-मसलत करण्याची गरज नाहीयाआधी दोनदा सर्वोच्च न्यायालयात अशाच स्वरूपाच्या याचिका सुनावणीसाठी आल्या होत्या. त्यांचा उल्लेख करून न्या. सिक्री व न्या. अशोक भूषण म्हणाले की, राज्यघटनेत रोस्टरचे अधिकार सरन्यायाधीशांकडे असतील, असे स्पष्ट केले नसले तरी न्यायालयातील शिस्त व योग्य पद्धतीचा विचार करता ते त्यांच्याकडेच असणे आवश्यक आहे. खटल्यांचे वाटप करताना त्यांनी इतर न्यायाधीशांशी चर्चा-मसलत करण्याची गरज नाही.ही होती पार्श्वभूमी : न्या. जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर व न्या. कुरियन जोसेफ यांनी जानेवारीमध्ये पत्रकार परिषद घेऊ न सर्वोच्च न्यायालयातील कामकाज व्यवस्थित चालत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर अ‍ॅड शांती भूषण यांनी ही याचिका केली.दोन बाजूआपली बाजू मांडताना अ‍ॅड शांती भूषण यांनी सरन्यायाधीशांना रोस्टरसाठी सल्ला व मार्गदर्शन देण्यासाठी अन्य न्यायाधीशांना मदत करणे अपेक्षित आहे, असे म्हटले होते.भारताचे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनीही अ‍ॅड. शांती भूषण यांच्या याचिकेस विरोध दर्शविताना एकाहून अधिक न्यायाधीशांकडे म्हणजेच कॉलेजियमकडे रोस्टरचे काम सोपवल्यास त्यामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले. मुळात सध्याच्या पद्धतीत बदल करण्याचे कारणच नाही, असे ते मत व्यक्त केले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय