मानकापुरातील कुंटणखान्यावर धाड

By Admin | Updated: August 26, 2015 00:19 IST2015-08-26T00:19:04+5:302015-08-26T00:19:04+5:30

दोन महिला गजाआड : दोन तरुणींची सुटका : गुन्हे शाखेची कामगिरी

Shankar on the road to Manakapura | मानकापुरातील कुंटणखान्यावर धाड

मानकापुरातील कुंटणखान्यावर धाड

न महिला गजाआड : दोन तरुणींची सुटका : गुन्हे शाखेची कामगिरी
नागपूर : गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मंगळवारी दुपारी न्यू मानकापुरातील जयहिंदनगरात सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर धाड घातली. येथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले तर, त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या दोन महिलांना अटक केली.
रुकसाना खान हफीज खान (वय ३५, रा. गिट्टीखदान गवळीपुरा) आणि कल्पना सतीश नायडू (वय ४७, रा. जयहिंदनगर न्यू मानकापूर) अशी आरोपी महिलांची नावे आहेत. या दोघी अनेक दिवसांपासून महिला-मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर, एसीपी नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एम. पोवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कल्पनाच्या निवासस्थानी धाड टाकली. तेथे दोन तरुणी वेश्याव्यवसाय करताना आढळल्या. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पैशाचे आमिष दाखवून कल्पना आणि रुकसाना धंदा करवून घेत असल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी कल्पना आणि रुकसाना या दोघींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,७ अन्वये मानकापूर ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली आहे.
----

Web Title: Shankar on the road to Manakapura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.