शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

लज्जास्पद ! 'सेल्फी'साठी उत्तर प्रदेशात परदेशी जोडप्याला लाठ्याकाठ्यांनी मारहाण, सुषमा स्वराज यांनी मागवला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 10:49 IST

भारत भ्रमंती करण्यासाठी आलेलं स्विर्त्झलँडमधील प्रेमी युगुलाला उत्तर प्रदेशातील फतेहपूर सीकरी येथे एका वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला.

आग्रा - भारत भ्रमंती करण्यासाठी आलेल्या स्विर्त्झलँडमधील प्रेमी युगुलाला उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिकरी येथे एका वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. फतेहपूर सिकरी येथे काही जणांच्या टोळक्यानं या परदेशी जोडप्यावर दगड आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. रविवारी (22 ऑक्टोबर) ही घटना घडली आहे. रक्तानं माखलेले हे परदेशी पर्यटक रस्त्यावर पडले होते आणि येणारी-जाणारी लोकं मात्र त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात व्यस्त होते. दरम्यान, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी परदेशी पर्यटकांना करण्यात आलेल्या मारहाणी प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे आणि राज्य सरकारला उत्तरासहीत अहवाल सादर करायला सांगितले आहे. शिवाय, परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन पर्यटकांची भेट घेण्यासही सांगितले आहे. दरम्यान, याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

मेरी द्रोज आणि क्युन्टीन जेर्मी क्लॉर्क असे मारहाण झालेल्या परदेशी पर्यटकांचं नाव आहे. 30 सप्टेंबरला मैत्रीण मेरी द्रोजसोबत भारतात आलेले क्युन्टीन जेर्मी क्लॉर्क सध्या दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मारहाण प्रकरणाबाबत त्यांनी सांगितले की, ''रविवारी (22 ऑक्टोबर) फतेहपूर सिकरी रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असताना, यादरम्यान काही तरुणांच्या घोळक्यानं त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्या घोळक्यानं काहीतरी टिप्पणी केली, पण आम्हाला काहीही समजलं नाही. त्यानंतर सेल्फी घेण्यासाठी त्यांनी आम्हाला जबरदस्तीनं रोखून ठेवलं''.

परदेशी पर्यटकांना त्रास देण्याच्या या प्रकाराचं काही वेळानं हाणामारीमध्ये रुपांतर झाले. पाठलाग करणा-या या घोळक्यानं क्लॉर्कचं डोकंच फोडलं. दरम्यान, या मारहाणीमुळे क्लॉर्क यांना एका कानानं कमी ऐकू येणार असल्याचं त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले आहे. मेरीदेखील या हल्ल्यात जखमी झाली आहे. 

''हल्ल्यानंतर आम्ही रक्तानं माखलेल्या अवस्थेतच रस्त्यावरच पडलो होतो आणि येणारी-जाणारी लोकं आम्हाला मदत करण्याऐवजी मोबाइलवर आमचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात व्यस्त होती'', अशी नाराजीही क्लॉर्कनं यावेळी व्यक्त केली.  क्लॉर्क  पुढे असेही म्हणाले की,''विरोध केल्यानंतर त्या घोळक्यानं आमचा पाठलाग करणं थांबवलं नाही. आमचे फोटो घेत होते, एवढंच नाही तर मेरीच्या जवळ जाण्याचाही प्रयत्न करत होते. त्यांना आम्हाला कुठेतरी घेऊन जायचे होते. मात्र विरोध केल्यानंतर त्यांनी आम्हाला दगड-लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली''. 

याप्रकरणी आग्रा पोलीस स्टेशन याप्रकरणाची चौकशी करत आहेत.   

 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSushma Swarajसुषमा स्वराज