शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! एका वर्षात 3 हजार कॉल्स, एकतर्फी प्रेमातून शैलजाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 09:03 IST

हत्या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत. आरोपी मेजर निखिल राय हा मेजर अमित द्विवेदीच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम करत होता.

नवी दिल्ली- सहकारी मेजरच्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी मेजर निखिल राय हांडा याला पोलिसांनी अटक केली आहे. परंतु या हत्या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत. आरोपी मेजर निखिल राय हा मेजर अमित द्विवेदीच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम करत होता. एका मुलाची आई असलेल्या शैलजाबरोबर निखिल लग्न करू इच्छित होता. परंतु शैलजानं त्याला वारंवार विरोध केला होता. या हत्येला अपघाताचं स्वरूप देण्यासाठी आरोपी निखिलनं गाडीच्या खाली तिला चिरडलं असून, या प्रकरणात पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.या प्रकरणात पोलिसांनी शैलजाच्या मोबाईलचा सीडीआर काढला आहे. त्यावरून शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान शैलजाचं मेजर निखिल हांडाबरोबर बोलणं झालं होतं. इतकेच नव्हे, तर हांडानं शैलजाला वर्षभरात 3 हजार कॉल्स केल्याचंही उघड झालं आहे. त्यानंतर आता पोलीस सर्व बारीकसारीक धागेदोरे जोडून पुरावे गोळा करत आहेत. एका रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही शैलजाला निखिल भेटण्यास आल्याचं दिसत आहे. त्याच वेळी निखिल हांडाबरोबर शैलजा रुग्णालयाच्या बाहेर गेली, ज्या गाडीत शैलजा होती, ती एक पांढ-या रंगाची कार होती.शनिवारी दुपारी बराड स्क्वेअर परिसरात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिली होती. सुरुवातीचे काही तास या मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हती. मात्र संध्याकाळी साडे चारच्या सुमारास मेजर अमित द्विवेदी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पत्नी बेपत्ता झाल्याची माहिती दिल्यावर हा मृतदेह शैलजाचाच असल्याचं निष्पन्न झालं. 

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून