शाहरुख खान 'डॉक्टरेट'नं सन्मानित

By Admin | Updated: December 26, 2016 15:53 IST2016-12-26T15:38:53+5:302016-12-26T15:53:16+5:30

मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाकडून अभिनेता शाहरुख खानला डॉक्टरेट पदवीनं गौरवण्यात आलं

Shahrukh Khan honors 'doctorate' | शाहरुख खान 'डॉक्टरेट'नं सन्मानित

शाहरुख खान 'डॉक्टरेट'नं सन्मानित

ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. 26 - मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाकडून अभिनेता शाहरुख खानला डॉक्टरेट पदवीनं गौरवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते शाहरुखला हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. हैदराबादेतील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठानं काही दिवसांपूर्वीच शाहरुखला डॉक्टरेट जाहीर केली. हैदराबादच्या गाचीबोवली परिसरातील कॅम्पसमध्ये मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठाचा 6वा दीक्षान्त समारंभ झाला. त्यादरम्यान शाहरुखला डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. शाहरुख आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतानाही या पुरस्कारासाठी आवर्जून हैदराबादेत उपस्थित राहिला आणि त्यानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला आहे.

शाहरुख खान म्हणाला, मला हा सन्मान प्राप्त झाल्यामुळे मी फार खूश आहे. मला हैदराबादेतून पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्यामुळे माझी आज खूप आनंदीत असेल. हैदराबाद हे माझ्या आईचं जन्मस्थळ आहे. शाहरुख खान सोबत राजीव सराफ यांना डॉक्टरेटनं सन्मानित करण्यात आलं आहे. राजीव यांना ही पदवी ऊर्दू भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दिलेल्या योगदानाखातर प्रधान करण्यात आली आहे.

दरम्यान, या दीक्षान्त सोहळ्यात 2855 पदवीधर, मास्टर्स आणि 276 एमफिल आणि पीएचडी धारकांनाही डिग्री प्रदान करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला तेलंगणाचे राज्यपाल इएसएस नरसिम्हन, उपमुख्यमंत्री मोहम्मद महमूद अली आणि कुलगुरू जफर युनूस सारेशवालाही उपस्थित होते.

Web Title: Shahrukh Khan honors 'doctorate'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.