जम्मू-काश्मीर बोर्डाच्या 12वीच्या निकालात शाहिरा राज्यात प्रथम

By Admin | Updated: February 2, 2017 11:50 IST2017-02-02T11:50:27+5:302017-02-02T11:50:27+5:30

जम्मू आणि काश्मीरमधील 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून, या परीक्षेत शाहिरा ही विद्यार्थिनी

Shahriva first in 12th state of Jammu and Kashmir Board | जम्मू-काश्मीर बोर्डाच्या 12वीच्या निकालात शाहिरा राज्यात प्रथम

जम्मू-काश्मीर बोर्डाच्या 12वीच्या निकालात शाहिरा राज्यात प्रथम

 ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 2 -   जम्मू आणि काश्मीरमधील 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून, या परीक्षेत शाहिरा ही विद्यार्थिनी 500 पैकी 498 गुण मिळवून राज्यातून प्रथम आली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी चकमकीत मारला गेलेला बुऱ्हाण वाणी ज्या शाळेचा विद्यार्थी होता. त्याच शाळेतील शाहिरा हि विद्यार्थिनी आहे. 
"12वीच्या परीक्षेत राज्यातून प्रथम आल्याचा खूप आनंद झाला आहे. मी माझ्या सर्व शिक्षकांचे आभार मानते. आता भविष्यात मला नीट ची परीक्षा द्यायची आहे," असे शाहिराने आपल्या यशाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले. तर शाहिराच्या वडिलांनीही आपल्या मुलीच्या यशाबाबत आनंद व्यक्त केला. 

Web Title: Shahriva first in 12th state of Jammu and Kashmir Board