शाहजहांपूर - उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर येथे लग्नावरून घरी परतणाऱ्या ४ युवकांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात कारमधील अन्य २ जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त कारमधील सर्व युवकांनी दारू प्यायल्याचं उघड झालं आहे. चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली त्यात ही दुर्घटना घडली आहे.
घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या दुकानदाराने सांगितले की, अचानक एका मोठा आवाज ऐकायला आला त्यात जवळ जाऊन पाहिले तेव्हा रस्त्यावर भयंकर अपघात झाला होता. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनेची माहिती पोलीस स्टेशनला कळवली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी अपघातग्रस्त कारमधील ४ युवकांचे मृतदेह बाहेर काढले अशी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या तपासात हे युवक एका लग्नाहून घरी परतत होते, चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. त्यात चौघांचा मृत्यू झाला. लवकरच ट्रक चालकाला अटक करू अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
कारमधील अन्य २ युवकांची स्थिती गंभीर होती. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ दोघांना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या जखमींची प्रकृती नाजूक आहे. स्थानिकांच्या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त गाडीत अडकलेले ४ युवकांचे मृतदेह बाहेर काढले. कारमधील दोघांची स्थिती गंभीर होती असं पोलिसांनी म्हटलं. गॅस कटरच्या सहाय्याने कारमधील मृतदेह बाहेर काढले. त्यातील २ जण जिवंत असल्याचं आढळलं. रात्रीच्या १२ च्या सुमारास हा अपघात घडला होता.
दरम्यान, या अपघात २५ वर्षीय राहुल, २७ वर्षीय विनय शर्मा, २२ वर्षीय आकाश, २४ वर्षीय गोपाळ या युवकांचा जागीच मृत्यू झाला तर ३० वर्षीय रोहित कुमार आणि ३५ वर्षीय रजत हे गंभीर जखमी झालेत. या दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.