बीफ पार्टी देणारे जम्मूतील आमदार रशिद यांच्यावर शाईहल्ला
By Admin | Updated: October 19, 2015 18:13 IST2015-10-19T16:24:12+5:302015-10-19T18:13:47+5:30
बीफ पार्टीचे आयोजन करणारे जम्मू काश्मीरमधील अपक्ष आमदार इंजिनीअर रशिद यांच्यावर सोमवारी दुपारी शाई फेकण्यात आली. हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
बीफ पार्टी देणारे जम्मूतील आमदार रशिद यांच्यावर शाईहल्ला
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - बीफ पार्टीचे आयोजन करणारे जम्मू काश्मीरमधील अपक्ष आमदार इंजिनीअर रशिद यांच्यावर सोमवारी दुपारी शाई फेकण्यात आली. हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
बीफ बंदीच्या जम्मू काश्मीर हायकोर्टाच्या निकालानंतर अपक्ष आमदार इंजिनीअर रशिद यांनी काही दिवसांपूर्वी बीफ पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीनंतर भाजपा आमदारांनी रशिद यांना विधानसभेतच मारहाण केली होती. आता पुन्हा एकदा रशिद यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी रशिद यांनी दिल्लीत पत्रकार परिषद आटपून निघत असताना त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. हिंदू सेनेचे नेते विष्णू गुप्ता यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
मुंबईत पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करणारे भाजपा नेते सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली होती.