शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

शाहीन बागमध्ये गोळीबार करणारा 'तो' आपचा कार्यकर्ता, तपासात उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 8:21 PM

दिल्लीतल्या शाहीन बागमध्ये गेल्या आठवड्यात गोळीबार करणारा कपिल गुर्जर हा आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देशाहीन बागमध्ये गेल्या आठवड्यात गोळीबार करणारा कपिल गुर्जर हा आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्राँचनं आरोपी कपिल गुर्जरची चौकशी केली असता ही माहिती उघड झाली आहे.क्राइम ब्रँचला तपासादरम्यान गुर्जरच्या मोबाइलमध्ये काही फोटो सापडले असून, त्यातूनच हा खुलासा झालेला आहे.

नवी दिल्लीः दिल्लीतल्या शाहीन बागमध्ये गेल्या आठवड्यात गोळीबार करणारा कपिल गुर्जर हा आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्राँचनं आरोपी कपिल गुर्जरची चौकशी केली असता ही माहिती उघड झाली आहे. कपिल गुर्जरच्या वडिलांनी 2019मध्ये आपची सदस्यता घेतली होती. क्राइम ब्रँचला तपासादरम्यान गुर्जरच्या मोबाइलमध्ये काही फोटो सापडले असून, त्यातूनच हा खुलासा झालेला आहे.या फोटोंमध्ये कपिल गुर्जर आणि त्याचे वडील गजे सिंह आम आदमी पार्टीचे संसद संजय सिंह, आप नेते आतिशीबरोबर दिसत आहेत. तसेच एका फोटोत कपिलचे वडील गजेसिंह गुर्जर दिल्लीतले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांबरोबर पाहायला मिळतायत. हा फोटो जवळपास वर्षभरापूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. या फोटोमध्ये कपिल आपची सदस्यता घेताना दिसतोय. तसेच कपिल आणि त्याच्या वडिलांसोबत कपिलचे जवळपास एक डझनांहून अधिक मित्र नेत्यांसोबतच्या फोटोत दिसत आहेत. याचदरम्यान त्यानं आम आदमी पार्टीची टोपीसुद्धा घातलेली पाहायला मिळतेय. शाहीन बागमध्ये कपिल गुर्जरनं हवेत गोळीबार केला होता.एक फेब्रुवारीला शाहीन बागमध्ये पोहोचून त्यानं पिस्तुलातून गोळीबार केला होता. गोळीचा आवाज आल्यानंतर घटनास्थळी खळबळ उडाली. पोलीस आणि आंदोलकांनी त्याला पकडलं. दिल्ली पोलिसांनी आरोपी कपिल गुर्जरला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांच्या कोठडीत पाठवले.नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात शाहीन बागमध्ये महिला आणि मुलं 15 डिसेंबरपासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. मंगळवारी त्यांचा धरणे आंदोलनाचा 52वा दिवस होता. सरकारनं हा कायदा मागे घ्यावा, तर आम्ही धरणं आंदोलन बंद करू, असंही आंदोलकांनी म्हटलं आहे.

टॅग्स :jnu attackजेएनयूcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक