शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

'अनेक दशकांनंतर श्रीनगरमध्ये थिएटर्स हाऊसफुल' पंतप्रधानांच्या वक्तव्याने शाहरुख खानचे चाहते खूश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 13:25 IST

पठाणमुळे बॉलिवूडला तर उभारी मिळालीच सोबतच अनेक सिंगल स्क्रीन थिएटरनाही संजीवनी मिळाली.

यशराज फिल्म्सच्या 'पठाण' मधून शाहरुखने (Shahrukh Khan) बॉलिवूडचा किंग आपणच हे दाखवून दिले आहे. पठाणची बॉक्सऑफिसवरील एकंदर कमाई बघता याचा अंदाज येईल. तब्बल ४ वर्षांनंतर शाहरुखने रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले.तीव्र विरोध पत्करुन पठाण रिलीज झाला आणि या बॉयकॉट ट्रेंडचा सिनेमावर काहीच परिणाम झालेला दिसला नाही. याउलट एकंदर कॉन्ट्रोव्हर्सीचा पठाणला फायदाच झाला. पठाणमुळे बॉलिवूडला तर उभारी मिळालीच सोबतच अनेक सिंगल स्क्रीन थिएटरनाही संजीवनी मिळाली. आता तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच 'पठाण'चे कौतुक केले आहे. 

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

संसदेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आदरणीय अध्यक्षजी, वर्तमानपत्रात बातमी आली होती जेव्हा लोक टीव्हीवर चमकण्यासाठी धडपडत होते तेव्हा कित्येक दशकांनंतर श्रीनगरमध्ये थिएटर हाऊसफुल सुरु आहेत.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्याचा नेटकऱ्यांनी पठाणशी संबंध जोडला आहे. शाहरुखचे चाहते तर भलतेच खूश झाले आहेत. एका चाहत्याने कमेंट केली की,'आता तर जगाने मान्य केले आहे. खरंच हा क्षण भारतासाठी अभिमानाचा आहे. शाहरुख खान आणि पठाणला प्रत्येकाकडून खूप प्रेम मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मान्य केले आहे.' तर आणखी एक चाहता म्हणतो,  'पंतप्रधान मोदींनाही माहित आहे की पठाण काय धुमाकूळ घालत आहे.'

'पठाण'च्या रिलीज आधीच सिनेमातील बेशरम रंग गाण्याने वादाला तोंड फुटले होते. गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकीनीवरुन हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. पंतप्रधानांच्या गुजरात राज्यातही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणत तीव्र विरोध झाला. मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतर बॉक्सऑफिस वरील कमाई आणि चाहत्यांचा उत्साह पाहता पठाणने तुफान कामगिरी केल्याचं दिसतंय.'पठाण'ने रिलीजच्या 14 व्या दिवशी 7.50 कोटींचा गल्ला जमवला आहे, ज्यामुळे 'पठाण' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'पठाण'ने सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत दक्षिण सिनेमाचा ब्लॉकबस्टर सिनेमा KGF 2 ला मागे टाकले आहे. 'पठाण'चे भारतातील सर्व भाषांमधील  एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन  446.02 कोटी आहे. तर वर्ल्डवाईड पठाण १००० कोटींच्या दिशेने वाटचाल करत आहे. 

टॅग्स :Pathan Movieपठाण सिनेमाShahrukh Khanशाहरुख खानParliamentसंसदBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी