पान मसाल्याच्या जाहिरातीप्रकरणी शाहरूख, अजयला एफडीएची नोटीस
By Admin | Updated: November 5, 2015 12:22 IST2015-11-05T12:19:16+5:302015-11-05T12:22:48+5:30
पान मसाल्याची जाहिरात करणे अभिनेता शाहरूख खान, अजय देवगण यांच्या अंगलट आले असून याप्रकरणी एफडीएने त्यांना नोटीस बजावली आहे.

पान मसाल्याच्या जाहिरातीप्रकरणी शाहरूख, अजयला एफडीएची नोटीस
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - पान मसाल्याची जाहिरात करणे अभिनेता शाहरूख खान, अजय देवगण यांच्या अंगलट आले असून याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने ( एफडीए) त्यांना नोटीस बजावली आहे. त्यात अभिनेता गोविंदाचाही समावेश आहे.
गुटखा, सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू किंवा पान मसाला या उत्पादनांवर बंदी असून त्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या कलाकारांना नोटिसा पाठवण्याचा निर्णय एफडीएने घेतला. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून राज्यात गुटखा व तत्सम उत्पादनांवर बंदी आहे. असे असूनही काही बॉलीवूड कलाकार अशा उत्पादनांच्या जाहिराती करतात. त्यामुळेच या कलाकारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. `