चिमुकलीवर शाळेत लैंगिक अत्याचार
By Admin | Updated: August 4, 2015 23:38 IST2015-08-04T23:38:22+5:302015-08-04T23:38:22+5:30
येथील इंदिरानगरातील एका शाळेत तीन वर्षांच्या मुलीवर शाळेच्याच वॉचमनने कथितरीत्या लैंगिक अत्याचार केल्याची संतप्त घटना मंगळवारी उघडकीस

चिमुकलीवर शाळेत लैंगिक अत्याचार
बंगळुरू : येथील इंदिरानगरातील एका शाळेत तीन वर्षांच्या मुलीवर शाळेच्याच वॉचमनने कथितरीत्या लैंगिक अत्याचार केल्याची संतप्त घटना मंगळवारी उघडकीस आली. या घटनेनंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांसह काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेबाहेर निदर्शने केली. यावेळी निदर्शन करणारे पालक आणि पोलिसांत संघर्ष उडाला. दरम्यान, निदर्शकांवर बळाचा वापर केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोमवारी ही घटना घडली. पीडित मुलगी दुपारी शाळेतून वेदनेने विव्हळत घरी आली. तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात हलविले. वैद्यकीय तपासणीतून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. (वृत्तसंस्था)