प्रसूत झालेल्या महिलेवर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये लैंगिक जबरदस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2016 17:54 IST2016-02-14T17:54:26+5:302016-02-14T17:54:26+5:30
हरयाणामधील एका खासगी रुग्णालयात नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलेवर लैंगिक जबरदस्ती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रसूत झालेल्या महिलेवर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये लैंगिक जबरदस्ती
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - हरयाणामधील एका खासगी रुग्णालयात नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलेवर लैंगिक जबरदस्ती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरयाणाच्या झांज्जर जिल्ह्यात बहादूरगड येथील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात एका २२ वर्षीय महिलेची शुक्रवारी प्रसूती झाली.
शनिवारी सकाळच्यावेळी आरोपी डॉक्टरच्या वेशात महिलेच्या खोलीत आला होता. पीडित महिलेला सुरुवातीला डॉक्टर तपासणी करत आहे असे वाटले. मात्र जेव्हा डॉक्टरचा चुकीचा इरादा लक्षात येताच तिने आक्षेप घेतला. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेला. शुक्रवारीच पिडित महिलेने सिझरींग ऑपरेशनव्दारे अर्भकाला जन्म दिला.
आरोपीची छायाचित्रे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहेत. फुटेजनुसार तो गाडी घेऊन आला होता. हरयाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांनी पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे धाडसत्र सुरु आहे.