लैंगिक छळ : तक्रारींचे निराकरण वेळेत करा
By Admin | Updated: October 22, 2016 01:07 IST2016-10-22T01:07:38+5:302016-10-22T01:07:38+5:30
सरकारी कार्यालयांत महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींचे निराकरण ठराविक कालमर्यादेतआणि संवदेनशीलरित्या मार्गी झाले पाहिजे, अशी भूमिका केंद्रीय महिला

लैंगिक छळ : तक्रारींचे निराकरण वेळेत करा
नवी दिल्ली : सरकारी कार्यालयांत महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींचे निराकरण ठराविक कालमर्यादेतआणि संवदेनशीलरित्या मार्गी झाले पाहिजे, अशी भूमिका केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने घेतली आहे.
सरकारी कार्यालयांत महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींच्या चौकशीत होत असलेल्या विलंबाच्या तक्रारींची या मंत्रालयाने गांभीर्याने दखल घेतली आहे. आम्ही या तक्रारी ठराविक कालमर्यादेत आणि संवेदनशीलतेने निकाली
काढाव्यात असा ‘कठोर’ सल्ला देणार असल्याचे शुक्रवारी मंत्री मनेका गांधी म्हणाल्या.
केंद्रीय सरकारी कार्यालयांतील महिलांनी मनेका गांधी यांची भेट घेऊन कार्यालयांतील अंतर्गत चौकशी समित्या चौकशीला नेहमीच विलंब लावतात व तक्रारींचे निराकरण मार्गदर्शक सूचनांनुसार करीत नाहीत, अशा तक्रारी केल्या. कार्यालयांत होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारी कशा पद्धतीने हाताळल्या जातात याचा मी माझ्या पातळीवर आढावा घेईन, असे गांधी म्हणाल्याचे मंत्रालयाने आपल्या टिष्ट्वटरद्वारे सांगितले.
वेगवेगळ््या केंद्रीय सरकारी विभागातील अंतर्गत तक्रारी समित्यांच्या प्रमुखांना गांधी यांनी निवडक तक्रारींची सोडवणूक कशी केली हे दाखवा (प्रेझेंटेशन) यासाठी बोलावून घेतले होते. तक्रारींचे निराकरण निश्चित कालावधीत व संवेदनशीलरित्या कसे करावे यासाठी कठोर मार्गदर्शक सूचना देण्यास आम्हाला या सादरीकरणाचा चांगला उपयोग होईल, असे गांधी म्हणाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मंत्रालय लक्ष घालणार
- सरकारी कार्यालयांतील ज्या महिलांच्या तक्रारींचे निराकरण अजून झालेले नाही
त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा व कार्यालयात अंतर्गत चौकशी समिती नसेल तर त्याचीही माहिती द्यावी, असे मनेका गांधी यांनी म्हटले.
- अशासकीय कार्यालयांतील लैंगिक
छळाच्या तक्रारींच्या हाताळणीतही मंत्रालय
लक्ष घालणार असल्याचे मनेका गांधी यांनी म्हटले.