स्वाइन फ्लूमुळे खेडमधील तरूणाचा मृत्यू
By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:26+5:302015-02-18T23:54:26+5:30
बळींची संख्या १८ वर : १२ जण व्हेंटिलेटवर

स्वाइन फ्लूमुळे खेडमधील तरूणाचा मृत्यू
ब ींची संख्या १८ वर : १२ जण व्हेंटिलेटवरपुणे : शहराला बसलेला स्वाइन फ्लूचा विळखा आणखी घट्ट होऊ लागला असून आज या आजाराने आणखी एकाचा मृत्यू झाला. यामुळे या वर्षातील बळींची संख्या १८ वर पोहोचली आहे. दरम्यान, आज लागण झालेले ८ नवे रुग्ण सापडले असून रुग्णालयात दाखल असलेल्या १२ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेला ३२ वर्षीय तरूण पुणे जिल्हयातील खेड तालुक्यात राहणारा आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तपासणीत त्याला स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले होते. उपचार सुरू असताना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याने उपचारास ५ दिवस उशीर केल्याचे पुणे महापालिकेने आपल्या अहवालात नोंदविले आहे. दरम्यान, आज दिवसभरात तब्बल २ हजार ७९९ जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६०४ संशयितांना टॅमीफ्लू औषधे देण्यात आली आणि ७५ जणांच्या घशातील कफांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. दरम्यान,आज पूर्णपणे बरे झालेल्या २ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.-------------------