शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत बोट उलटल्यानं 11 जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 17:23 IST

एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी

अमरावती: आंध्र प्रदेशात गोदीवरीत बोटीत उलटल्यानं 11 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 23 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या बोटीतून 61 जण प्रवास करत होते. सध्या एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या असून मदतकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी जिल्ह्यातील सर्व मंत्र्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय बचाव कार्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.  गोदावरी नदीला सध्या पूर आला आहे. सध्या घटनास्थळावरील परिस्थितीचा आढावा घेतला जात असल्याची माहिती एसपी अदनान अन्सारी यांनी दिली. आंध्र प्रदेश पर्यटन विकास मंडळाच्या बोटीत 61 जण होते. यामध्ये चालकासह 11 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुच्चुलरु भागात बोट उलटली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालक गौतम सवांग आणि मुख्य सचिव एल. व्ही. सुब्रमण्यम यांना बचाव कार्यावर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. पर्यटकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची अतिरिक्त पथकं तैनात करण्याचे आदेशदेखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस प्रमुखांनी भारतीय नौदलाकडे मदत मागितली. नौदलानं 1 हेलिकॉप्टर पाठवून बचाव कार्यात सहकार्य करावं, असं आवाहन नौदलाकडे केलं. तर राज्याचे मुख्य सचिव एल. व्ही. सुब्रमण्यम यांनी गोदावरीचे जिल्हाधिकारी मुरलीधर रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असून त्यांना घटनेबद्दलची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातAndhra Pradeshआंध्र प्रदेश