सातवा वेतन आयोग; शिफारशी १८ महिन्यांत येणार
By Admin | Updated: March 13, 2015 23:09 IST2015-03-13T23:09:51+5:302015-03-13T23:09:51+5:30
सातवा वेतन आयोग गठित झाला आहे. गठित झाल्याच्या १८ महिन्यानंतर आयोगाला आपल्या शिफारशी सादर करायच्या आहेत, असे सरकारने शुक्रवारी लोकसभेत स्पष्ट केले.

सातवा वेतन आयोग; शिफारशी १८ महिन्यांत येणार
नवी दिल्ली : सातवा वेतन आयोग गठित झाला आहे. गठित झाल्याच्या १८ महिन्यानंतर आयोगाला आपल्या शिफारशी सादर करायच्या आहेत, असे सरकारने शुक्रवारी लोकसभेत स्पष्ट केले.
भारत सरकारने २८ फेबु्रवारी २०१४ रोजी सातवा वेतन आयोग गठित केला. अशोक कुमार माथूर आयोगाचे अध्यक्ष आहेत, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. केंद्र सरकारच्या कार्यालयांत ५ दिवसांचा आठवडा करण्याचा वा केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ५८ वर्षे करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)