साधूमहंतांनी ठोकला स्नानगृहातच मुक्काम
By Admin | Updated: July 11, 2015 01:38 IST2015-07-10T21:26:14+5:302015-07-11T01:38:58+5:30
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर तपोवन साधूग्राममध्ये जागा वाटप सुरू असुन ज्या आखाडा तसेच खालशांना जागा मिळाल्या नाहीत अशा साधूमहंतांनी थेट स्नानगृहातच मुक्काम ठेकला आहे.

साधूमहंतांनी ठोकला स्नानगृहातच मुक्काम
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर तपोवन साधूग्राममध्ये जागा वाटप सुरू असुन ज्या आखाडा तसेच खालशांना जागा मिळाल्या नाहीत अशा साधूमहंतांनी थेट स्नानगृहातच मुक्काम ठेकला आहे.
जागा ताब्यात मिळत नाही तोपर्यंत स्नानगृहाच्या जागेचाच निवारा म्हणून उपयोग काही साधूमहंतांनी सुरू केल्याचे चित्र सध्या तपोवन साधूग्राम परिसरात दिसुन येत आहे. काही आखाडयांचे महंत स्नानगृहातच दुपारच्यावेळी आवरासावर तसेच आराम करत असल्याचे त्यांच्याच चेल्यांकडून सांगण्यात आले आहे. प्लॉट वाटप झाले असले तरी आणखी राहूटया, पंडाल उभारणीचे काम सुरू केलेले नसल्याने सध्या साधूमहंतांना निवार्यासाठी प्रशासनाने साधूग्राममध्ये तयार केलेल्या स्नानगृहाचाच वापर निवारा शेड म्हणून करावा लागत आहे. सिंहस्थ कुंभमेळयासाठी महिनाभर अगोदर अनेक साधू महंत सिंहस्थात राबविण्यात येणार्या विविध धार्मिक कार्यक्रमाच्या नियोजनासाठी येत असतात. यावर्षी देखिल साधूमहंत दाखल झाले असुन जो पर्यंत राहूटया, पंडाल उभारणीचे काम पुर्ण होत नाही तोपर्यंत स्नानगृहाचा ताबा असल्याचे साधूमहंतांनी बोलून दाखविले. (वार्ताहर)