सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार
By Admin | Updated: December 13, 2015 22:39 IST2015-12-13T22:39:18+5:302015-12-13T22:39:18+5:30
दिल्लीत एका सात वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी रविवारी सकाळी एका आरोपीला अटक केली

सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार
नवी दिल्ली : दिल्लीत एका सात वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी रविवारी सकाळी एका आरोपीला अटक केली; अन्य दोन आरोपी अद्याप फरार आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी अल्पवयीन असून, तो पीडित मुलीच्या शेजारी राहणारा आहे.
पीडित मुलीला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या मुलीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि तिला आणखी काही दिवस उपचारासाठी रुग्णालयातच ठेवले जाणार आहे, असे एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले. तीन नराधमांनी या मुलीला सार्वजनिक बगिच्यात नेऊन तेथे तिच्यावर बलात्कार केला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)