नागपूर विद्यापीठावर सात हजाराचा दंड
By Admin | Updated: February 14, 2015 01:07 IST2015-02-14T01:07:15+5:302015-02-14T01:07:15+5:30
नागपूर : महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाचे आयुक्त वसंत पाटील यांनी शुक्रवारी अर्जदाराने मागितलेली माहिती देण्यात अपयशी ठरलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला सात हजार रुपये दंड सुनावला. तसेच, एक महिन्यात माहिती न दिल्यास दंड वाढत जाईल असे स्पष्ट केले.

नागपूर विद्यापीठावर सात हजाराचा दंड
न गपूर : महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाचे आयुक्त वसंत पाटील यांनी शुक्रवारी अर्जदाराने मागितलेली माहिती देण्यात अपयशी ठरलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला सात हजार रुपये दंड सुनावला. तसेच, एक महिन्यात माहिती न दिल्यास दंड वाढत जाईल असे स्पष्ट केले.डॉ. मिलिंद जीवने असे अर्जदाराचे नाव आहे. जीवने यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी २०१३ मध्ये नागपूर विद्यापीठात माहितीच्या अधिकारात अर्ज करून सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागांची २००३ पासून माहिती मागितली होती. वेळेत माहिती न मिळाल्यानंतर अपील केले होते. त्यावर अपिलीय अधिकारी उपकुलसचिव प्रशांत मोहिते यांनी माहिती देण्याचे आदेश दिले होते. यानंतरही माहिती मिळाली नाही. यामुळे त्यांनी आयोगाकडे धाव घेतली आहे. नागपूर विद्यापीठाने सहायक प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी २००३ पासून सहावेळा जाहिरात प्रसिद्ध केली आहे. चारवेळा उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. परंतु, असंख्य नेट-सेट उमेदवार असतानाही नियुक्ती कोणाचीच करण्यात आलेली नाही, असे जीवने यांनी सांगितले.