छत्तीसगढ चकमकीत सात नक्षलवादी ठार
By Admin | Updated: February 22, 2017 03:59 IST2017-02-22T03:59:46+5:302017-02-22T03:59:46+5:30
छत्तीसगढच्या नारायणपूर जिल्ह्यात पुष्कल गावी मंगळवारी पोलिसांसोबत कित्येक तास

छत्तीसगढ चकमकीत सात नक्षलवादी ठार
रायपूर : छत्तीसगढच्या नारायणपूर जिल्ह्यात पुष्कल गावी मंगळवारी पोलिसांसोबत कित्येक तास झालेल्या जोरदार चकमकीनंतर सात नक्षलवादी ठार झाले. नारायणपूर आणि दांतेवाडा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या जंगलाची पोलीस नाकेबंदी करत असता त्यांच्यावर नक्षलींनी गोळीबार सुरु केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी अनेक तास गोळीबार होत राहिला, असे नक्षलवादीविरोधी दलाचे विशेष पोलीस महासंचालक डी.एम. अवस्थी यांनी सांगितले.