नवी दिल्ली : छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे नेते, माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह महाराष्ट्रातील सात खासदारांचा कार्यकाळ समाप्त होत असून, ते राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. भाजपच्या सर्वाधिक ३० खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे.
२०२६ मध्ये पाच राज्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. याशिवाय, राज्यसभेतील ७१ खासदारांचा कार्यकाळही यंदा पूर्ण होत आहे. मार्चमध्ये १, एप्रिल ३७, जून २२ आणि नोव्हेंबरमध्ये ११ खासदार निवृत्त होणार आहेत.
महाराष्ट्रातील या ७ खासदारांचा समावेश महाराष्ट्रातील सर्व सातही खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी पूर्ण होत आहे. यात राष्ट्रवादी (शरद पवार) प्रमुख शरद पवार आणि डॉ. फौजिया खान, भाजपचे डॉ. भागवत कराड आणि धैर्यशील मोहन पाटील, काॅंग्रेसच्या रजनी पाटील, उद्धवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि राज्यमंत्री रामदास आठवले यांचा समावेश आहे.
Web Summary : Seven Maharashtra Rajya Sabha MPs, including BJP's Bhagwat Karad, are retiring in April 2026. Those retiring include Sharad Pawar, Fauzia Khan, Rajni Patil, Priyanka Chaturvedi, Dhairyashil Patil and Ramdas Athawale.
Web Summary : महाराष्ट्र के भाजपा नेता भागवत कराड समेत सात राज्यसभा सांसद अप्रैल 2026 में सेवानिवृत्त होंगे। शरद पवार, फौज़िया खान, रजनी पाटिल, प्रियंका चतुर्वेदी, धैर्यशील पाटिल और रामदास अठावले शामिल हैं।