शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमधल्या दोन चकमकीत 11 दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान, दोन जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 11:49 IST

जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनाग आणि शोपियनमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनाग आणि शोपियनमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात 11 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर दोन जवान शहीद झाले आहेत. एका दहशतवाद्याला जिवंत पकडलं असून, तो हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित असल्याचं बोललं जातंय. अनंतनागमधल्या दरगाडमध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं होतं. तर दुस-याला जिवंत पकडण्यात आलं आहे. खात्मा करण्यात आलेला दहशतवादी स्थानिक असून, त्याला शरण येण्यास सांगूनही तो शरण आला नाही, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी दिली आहे. तत्पूर्वी अनंतनाग आणि शोपियानमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळताच त्यांनी आजूबाजूच्या परिसराला घेराव घातला. सीआरपीएफ आणि काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीमही राबवली. त्यानंतर सर्व बाजूनं घेरलं गेल्याचं लक्षात येताच दहशतवाद्यांनी गोळीबारास सुरुवात केली. त्याच्या प्रत्युत्तरादाखल सीआरपीएफ जवानांनीही गोळीबार केला. या गोळीबारात 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सीआरपीएफ जवानांना यश आलं. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा होता. तो ताब्यात घेण्यात आला आहे. दहशतवाद्यांशी पहिली चकमक अनंतनागपासून सात किलोमीटर अंतरावरील दरगाड येथे झाली होती. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. मारण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नावं रौफ बशिर शेख आहे. तर त्याचा साथीदार आमिरला पोलिसांनी अटक केली. रौफ गेल्या महिन्यात दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. ते दोघेही हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते. अनंतनागपाठोपाठ शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत 3 जवान जखमी झाले आहेत. 

टॅग्स :Terrorismदहशतवादterroristदहशतवादी