घरातूनच नेले होते सात लाख रुपये
By Admin | Updated: February 5, 2016 00:33 IST2016-02-05T00:33:01+5:302016-02-05T00:33:01+5:30
जळगाव: रस्त्यात कार अडवून सात लाख रुपये लांबविल्याच्या प्रकरणात सोहम पॉलिमर या चटई कंपनीचे मालक रुपेश दत्तात्रय चौधरी (वय ४१ रा.अयोध्या नगर) यांनी उत्पन्नातून मिळालेल्या अकरा लाख रुपयांचे विवरण बुधवारी पोलिसांकडे सादर केले. अयोध्यानगरातील घरात ठेवलेल्या अकरा लाख रुपयांमधून सात लाख रुपये घेवून कंपनीत जाण्यासाठी निघाले.तत्पुर्वी शहरात कामानिमित्त ते आले होते, ते काम आटोपून कंपनीत जात असताना एमआयडीसीतील एच सेक्टरमधील ट्रायडंट कंपनीजवळ दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी कार अडवून ही रक्कम लांबविली होती. दरम्यान, ही रक्कम आपल्या व्यवसायाची असून त्याचा हवालाशी काहीही संबध नसल्याचे स्पष्टीकरण रुपेश चौधरी यांनी दिले आहे. दोन दिवसापासून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.

घरातूनच नेले होते सात लाख रुपये
ज गाव: रस्त्यात कार अडवून सात लाख रुपये लांबविल्याच्या प्रकरणात सोहम पॉलिमर या चटई कंपनीचे मालक रुपेश दत्तात्रय चौधरी (वय ४१ रा.अयोध्या नगर) यांनी उत्पन्नातून मिळालेल्या अकरा लाख रुपयांचे विवरण बुधवारी पोलिसांकडे सादर केले. अयोध्यानगरातील घरात ठेवलेल्या अकरा लाख रुपयांमधून सात लाख रुपये घेवून कंपनीत जाण्यासाठी निघाले.तत्पुर्वी शहरात कामानिमित्त ते आले होते, ते काम आटोपून कंपनीत जात असताना एमआयडीसीतील एच सेक्टरमधील ट्रायडंट कंपनीजवळ दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी कार अडवून ही रक्कम लांबविली होती. दरम्यान, ही रक्कम आपल्या व्यवसायाची असून त्याचा हवालाशी काहीही संबध नसल्याचे स्पष्टीकरण रुपेश चौधरी यांनी दिले आहे. दोन दिवसापासून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.