सात किलोचे बाळ
By Admin | Updated: November 9, 2015 22:57 IST2015-11-09T22:57:50+5:302015-11-09T22:57:50+5:30
फिरदोस खातुम (३६) या महिलेने तब्बल १४.७७ पौंडांच्या (७ किलो) बाळाला गुरुवारी येथील राजा राम कलावती हॉस्पिटलमध्ये जन्म दिला.

सात किलोचे बाळ
ओराई, उत्तर प्रदेश : फिरदोस खातुम (३६) या महिलेने तब्बल १४.७७ पौंडांच्या (७ किलो) बाळाला गुरुवारी येथील राजा राम कलावती हॉस्पिटलमध्ये जन्म दिला. हे तिचे नववे अपत्य आहे. हे बाळंतपण तिचे नैसर्गिक झाले असून अवघ्या १५ मिनिटांत फिरदोस खातुुम मोकळ््या झाल्या. भारतात एवढ्या मोठ्या वजनाचे बाळ प्रथमच जन्माला आल्याचे डॉक्टरांनी मान्य केले असून त्यांच्या दृष्टिने हा चमत्कार आहे. एवढे वजन असूनही या बाळाने आईच्या पोटातून जगात अतिशय सहजपणे पाय ठेवला यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही, असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. बाळ आणि आईची प्रकृती छान आहे.