इसिंससोबत सात भारतीय, अन्य सहा जणांचा मृत्यू

By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:36+5:302015-08-03T22:26:36+5:30

नवी दिल्ली : इराक आणि सिरियामध्ये आयएसआयएस या दहशतवादी संघटनेसोबत सात भारतीय जुळलेले आहेत आणि या सातपैकी दोघे मुंबई जवळच्या कल्याण येथील राहणारे असून एक जण ऑस्ट्रेलियात राहणारा काश्मिरी आहे. तर आयएसआयएसमध्ये सामील झालेले अन्य चार जण प्रत्येकी तेलंगण, कर्नाटकची राजधानी बेंगळुरू, ओमान आणि सिंगापूरचे आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

Seven Indians, and six others die with Einstein | इसिंससोबत सात भारतीय, अन्य सहा जणांचा मृत्यू

इसिंससोबत सात भारतीय, अन्य सहा जणांचा मृत्यू

ी दिल्ली : इराक आणि सिरियामध्ये आयएसआयएस या दहशतवादी संघटनेसोबत सात भारतीय जुळलेले आहेत आणि या सातपैकी दोघे मुंबई जवळच्या कल्याण येथील राहणारे असून एक जण ऑस्ट्रेलियात राहणारा काश्मिरी आहे. तर आयएसआयएसमध्ये सामील झालेले अन्य चार जण प्रत्येकी तेलंगण, कर्नाटकची राजधानी बेंगळुरू, ओमान आणि सिंगापूरचे आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
आयएसआयएसकडून लढलेल्या आणि मारले गेलेल्या सहा भारतीयांमध्ये तिघे इंडियन मुजाहिदीनचे सदस्य होते. त्यात सुल्तान अजमेर शाह आणि बडा साजीद यांचा समावेश आहे. हे तिघेही पाकिस्तानमध्ये राहात असताना आयएसआयएस या संघटनेसोबत जुळले होते. याशिवाय त्यात दोघे महाराष्ट्रातील आणि एक जण तेलंगणचा होता.
गुप्तचर संस्थांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयएसआयएससोबत असलेल्या सात पैकी सहा भारतीयांना युद्धात उतरविण्यात आलेले नाही. हे सर्व जण लढणाऱ्या अन्य सदस्यांची मदत करीत असतात. त्यांना भोजन तयार करणे आणि वाहनचालक किंवा हेल्पर म्हणूनच नेमण्यात आले आहे. सातपैकी केवळ एकाच भारतीयाच्या हातात रायफल देण्यात आली आहे आणि त्याला प्रत्यक्ष युद्धात सामील करण्यात आले आहे. तो कल्याणचा राहणारा आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Seven Indians, and six others die with Einstein

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.