सात भारतीय कोळ्यांना अटक

By Admin | Updated: October 2, 2015 23:45 IST2015-10-02T23:45:47+5:302015-10-02T23:45:47+5:30

तामिळनाडूच्या रामेश्वरमलगत असलेल्या कच्छाथिवू समुद्र किनाऱ्यावर मासेमारी करीत असलेल्या सात भारतीय कोळ्यांना श्रीलंकन

Seven Indian fishermen arrested | सात भारतीय कोळ्यांना अटक

सात भारतीय कोळ्यांना अटक

रामेश्वरम : तामिळनाडूच्या रामेश्वरमलगत असलेल्या कच्छाथिवू समुद्र किनाऱ्यावर मासेमारी करीत असलेल्या सात भारतीय कोळ्यांना श्रीलंकन नौदलाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अटक केली. हे कोळी मासेमारी करीत आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडून आपल्या हद्दीत आल्यामुळे त्यांना अटक केल्याचे श्रीलंकन नौदलाने म्हटले आहे.
श्रीलंकन नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पारुथितुराई येथे भारतीय कोळ्यांच्या बोटींना वेढा दिला आणि त्यांना त्यांच्या बोटी व जीपीआरएस उपकरणांसह ताब्यात घेतले, अशी माहिती नागापट्टीणमचे संयुक्त मत्स्योत्पादन संचालक सुब्बुराज यांनी दिली. (वृत्तसंस्था)

Web Title: Seven Indian fishermen arrested