शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सात हिजबुल अतिरेक्यांची सव्वाकोटीची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 07:07 IST

पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या ‘हिजबुल मुजाहिदीन’ या अतिरेकी संघटनेच्या सात दहशतवाद्यांच्या काश्मीरमधील १३ मालमत्तांवर अंमलबजावणी संचालयानालयाने (ईडी) मंगळवारी टांच आणली.

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या ‘हिजबुल मुजाहिदीन’ या अतिरेकी संघटनेच्या सात दहशतवाद्यांच्या काश्मीरमधील १३ मालमत्तांवर अंमलबजावणी संचालयानालयाने (ईडी) मंगळवारी टांच आणली.काश्मीरमधील दहशतवाद्यांना पुरविल्या जाणाºया आर्थिक साह्याच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ‘हिजबुल’चा पाकिस्तानात राहणारा प्रमुख सैयद सलाहुद्दीन व इतरांवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. त्याच अनुषंगाने ‘ईडी’ने ‘मनी लॉन्ड्रिंग’ कायद्यान्वये ही जप्तीची कारवाई केली. या मालमत्तांचे कागदोपत्री मूल्य सुमारे १.२२ कोटी रुपये आहे. ज्यांच्या मालमत्तांवर जप्ती आली आहे, त्यांत मोहम्मद शफी शाह याच्याखेरीज अन्य सहा हिजबुल दहशतवाद्यांचा समावेश आहे.हिजबुल मुजाहिदीन ही काश्मीरमधील दहशतवादात सर्वाधिक सक्रिय आहे. पाकिस्तानातील रावळपिंडी येथे बसलेला सैयद सलाहुद्दीन हा स्वघोषित ‘कमांडर’ हिजबुलची सूत्रे हलवित असतो.कुठे जातो हा पैसा?‘ईडी’ म्हणते की, दहशतवादी कारवायांसाठीचा हिजबुलचा हा पैसा हवाला, वस्तुविनिमय व हस्तकांच्या हस्ते भारतात पाठविला जातो. हिजबुलच्या काश्मीरमधील मृत वा सक्रिय दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना हा पैसा वाटला जातो.

टॅग्स :Hizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीनIndiaभारत