पर्यटन पॅकेजच्या आमिषाने सात कोटींना गंडा कंपनीचे सात संचालक कोठडीत

By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:40+5:302015-08-03T22:26:40+5:30

अहमदनगर : पर्यटनाचे पॅकेज तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीच्या आमिषाने हिब्ज हॉलिडेज प्रा. लि. या कंपनीने हजारो नागरिकांना गंडा घातला होता. त्यामध्ये एकट्या श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांकडून सात कोटी रुपये उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Seven crores of Ganda Company's seven directors for the bribe of tourism package | पर्यटन पॅकेजच्या आमिषाने सात कोटींना गंडा कंपनीचे सात संचालक कोठडीत

पर्यटन पॅकेजच्या आमिषाने सात कोटींना गंडा कंपनीचे सात संचालक कोठडीत

मदनगर : पर्यटनाचे पॅकेज तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीच्या आमिषाने हिब्ज हॉलिडेज प्रा. लि. या कंपनीने हजारो नागरिकांना गंडा घातला होता. त्यामध्ये एकट्या श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांकडून सात कोटी रुपये उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
हिब्ज हॉलिडेज कंपनीने पर्यटन पॅकेज देऊन लाभ मिळवून देण्याच्या आमिषाने राज्यातील विविध शहरांमध्ये लाखो रुपयांना गंडा घातला होता. बोगस कंपनी उभी करून ११ संचालकांनी शेकडो एजंटद्वारे कोट्यवधी रुपये उकळले होते. त्यानंतर कंपनीने गाशा गुंडाळल्याने नागरिकांना लाखो रुपये भरूनही सहलीला जाण्यास मिळाले नाही. तसेच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचाही लाभ मिळाला नाही. याप्रकरणी ७८ लाखांची फसवणूक झाल्याने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कंपनीच्या ११ संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी ११ पैकी ७ आरोपींना अटक केली असून ते सध्या कोठडीत आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Seven crores of Ganda Company's seven directors for the bribe of tourism package

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.