सात कंपन्यांच्या नूडल्सचे नमुने तपासणार

By Admin | Updated: June 9, 2015 01:06 IST2015-06-09T01:06:50+5:302015-06-09T01:06:50+5:30

एफएसएसएआयने सोमवारी नेस्ले इंडिया पाठोपाठ आयटीसी आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाईन यासह सात कंपन्यांच्या नूडल्स, पास्ता आणि मॅक्रोनी अशा विविध उत्पादनांच्या परीक्षणाचेही आदेश दिले.

Seven companies will examine the samples of noodles | सात कंपन्यांच्या नूडल्सचे नमुने तपासणार

सात कंपन्यांच्या नूडल्सचे नमुने तपासणार

नवी दिल्ली : मॅगी नूडल्समधील शरीरास हानीकारक पदार्थांमुळे गुणवत्तेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच अन्न सुरक्षा नियामक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) सोमवारी नेस्ले इंडिया पाठोपाठ आयटीसी आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाईन यासह सात कंपन्यांच्या नूडल्स, पास्ता आणि मॅक्रोनी अशा विविध उत्पादनांच्या परीक्षणाचेही आदेश दिले. यात टॉप रेमन, वाय-वाय, फूडल्स, यमी यांच्यासारख्या ३२ ब्रॅण्डच्या नूडल्स, पास्ता आणि मॅक्रोनी आदी उत्पादनांचा समावेश आहे.
परवानगी न घेता बाजारात बेधडकपणे आपल्या उत्पादनांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या इंस्टंड फूड्सला बाजारातून तात्काळ मागे घेण्याचे आदेशही एफएसएसएआय दिले आहे. याशिवाय ‘मॅगी न्यूटिलिशस पास्ता विथ टेस्टमेकर’च्या चार उत्पादनांचे (फ्लेवर्स)नमुने तपासण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यासंदर्भात एफएसएसएआयने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना पत्र लिहिले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

---------
आमची उत्पादने सुरक्षित
मॅगीपाठोपाठ अडचणीत आलेल्या आयटीसीने आमची उत्पादने पूर्णत: सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. कंपनीने आपल्या उत्पादनांचे एनएबीएल प्रमाणित लाईफ सायन्सेज अँड टेक्नॉलॉजी सेंटर, तसेच एफएसएसएआय मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत कठोर परीक्षण केलेले आहे. आमची उत्पादने पूर्णत: सुरक्षित आहेत, असा दावा आयटीसीच्या प्रवक्त्याने केला आहे. जीएसके कंझ्युमर हेल्थकेअरनेही आमची कंपनी कायदा आणि सर्व नियमांचे योग्य पालन करते, असा दावा केला आहे. सीजी फूडस्चे मुख्य कार्यकारी जी. पी. शाह यांनीही आपली उत्पादने अन्नसुरक्षा आणि नियामक प्राधिकरणाद्वारा सूचीबद्ध असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Seven companies will examine the samples of noodles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.