क्यासह ६ काडतुसे जप्त श्रीरामपूर: पोलिसांना आरोपींची धक्काबुक्की
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:24+5:302015-01-23T23:06:24+5:30
श्रीरामपूर : तालुका पोलिसांच्या हद्दीत निमगावखैरी येथून दोन गावठी के व काडतुसे जप्त केल्यानंतर आता श्रीरामपूर शहर पोलिसांच्या हद्दीत बेलापूर-कोल्हार रस्त्यावरही काडतुसांसह गावठी का जप्त करण्यात आला.

क्यासह ६ काडतुसे जप्त श्रीरामपूर: पोलिसांना आरोपींची धक्काबुक्की
श रीरामपूर : तालुका पोलिसांच्या हद्दीत निमगावखैरी येथून दोन गावठी कट्टे व काडतुसे जप्त केल्यानंतर आता श्रीरामपूर शहर पोलिसांच्या हद्दीत बेलापूर-कोल्हार रस्त्यावरही काडतुसांसह गावठी कट्टा जप्त करण्यात आला.गुरूवारी सायंकाळच्या सुमारास दोघे गावठी कट्टा खरेदीसाठी पल्सर मोटारसायकल उभी करून राहुरीहून येणार्या एका गिर्हाईकाची वाट पाहत होते. कट्टा विकत घेणारा तर आला नाहीच पण आरोपी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेलापूर-कोल्हार रस्त्यावर लावलेल्या सापळ्यात अलगद अडकले. प्रेम पांडुरंग चव्हाण (वय ३२, रा. मोरगेवस्ती) व भारत उर्फ सोन्या मनोहर चावरे (वय २३, रा. दत्तनगर,श्रीरामपूर)अशी त्यांची नावे आहेत. त्यांंच्याकडून एक गावठी कट्टा व ६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपींना पकडत असताना त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यामुळे इतर कलमांसोबतच सरकारी कामात अडथळा आणल्याचाही गुन्हा आरोपींविरूद्ध नोंदविण्यात आला आहे. आरोपींकडून लाल रंगाची पल्सर मोटारसायकल (क्रमांक एम. एच. १५/ ए.एल. ६१९१) जप्त करण्यात आली. पोलीस काँस्टेबल दादासाहेब शंकर लोंढे यांच्या फिर्यादीवरून चव्हाण व चावरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार सुधीर पाटील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)