शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भुकेले जीव, रुग्णांसाठी धावून आले ‘सेवा किचन’, खुशरू पोचा यांची देशभरात मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 09:15 IST

खुशरू पोचा नामक देवदूताने गरजू नागरिकांना रेशन आणि कोरोनाच्या रुग्णांसाठी ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिल्यामुळे समाजात माणुसकी अजून जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे.

नागपूर : भुकेल्या व्यक्तीच्या पोटात दोन घास जावेत यासाठी धडपड करतो, तो खरा माणूस. कोरोनामुळे आधीच नागरिकांचा रोजगार हिरावला गेल्यामुळे त्यांना दोन वेळच्या भोजनासाठी धडपड करावी लागत आहे. अशा स्थितीत खुशरू पोचा नामक देवदूताने गरजू नागरिकांना रेशन आणि कोरोनाच्या रुग्णांसाठी ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिल्यामुळे समाजात माणुसकी अजून जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे.खुशरू पोचा हे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मुख्य कार्यालय अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. सेवा किचन या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून ते समाजसेवा करीत आहेत. त्यांच्या संस्थेची कुठेही नोंदणी झालेली नाही. समाजकार्य करताना ते कधीच कुणाकडून आर्थिक मदत घेत नाहीत. समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या मदतीवर ते गरजू नागरिकांना मदत करतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचा रोजगार हिरावला. अशा बिकट परिस्थितीत खुशरू पोचा यांनी गरजू नागरिकांना सातत्याने भोजन व रेशन किट पुरविल्या. दुसऱ्या लाटेतही त्यांचे कार्य थांबलेले नाही. नुकतेच त्यांनी मेळघाटमध्ये ४ आणि यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे २, असे ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठविले आहेत. गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांनी १५ किलोच्या रेशन किट तयार केल्या आहेत. त्यात पीठ, तांदूळ, डाळ, चहा, मसाले, लोणचे, तेल आदी वस्तूंचा समावेश आहे. अशा २५०० किट त्यांनी पांढरकवडा येथे पाठविल्या आहेत, तर गुजरातच्या अमरेली गावात ५०० किट, कोकणातील मालवण येथे २०० किट पाठवून गरिबांच्या चुली पेटविण्यास मदत केली आहे. नागपुरातही पॉझिटिव्ह असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ते दोन वेळचे भोजन पुरवीत आहेत, तसेच मेडिकलमध्ये दररोज १०० रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था ते करीत आहेत. देशातील २० रुग्णालयांत मदतखुशरू पोचा हे सेवा किचनच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून देशातील २० हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना भोजन पुरवीत आहेत. यात हैदराबाद, बंगळुरू, नवा रायपूर, नवी मुंबई, ठाणे, नवी दिल्ली आणि नागपूर येथील रुग्णालयांचा समावेश आहे. हमाल बांधवांना आधारलॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्याने हमाल बांधवांचा रोजगार बुडाला. पोचा यांनी त्यांना महिनाभराचे रेशन देऊन जगण्यासाठी आधार दिला. आता रेल्वेगाड्या सुरू झाल्या; परंतु भीतीमुळे प्रवासी हमाल बांधवांना काम देण्याचे टाळत आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. अशा कठीण परिस्थितीत पोचा हे सध्या हमाल बांधवांना महिनाभराचे रेशन पुरवित आहेत.

टॅग्स :foodअन्नIndiaभारत