'एटीएम' मशिनमध्ये बदल करण्यासाठी कृती दलाची स्थापना
By Admin | Updated: November 14, 2016 17:07 IST2016-11-14T17:07:48+5:302016-11-14T17:07:48+5:30
'एटीएम'च्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला असून, आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुद्रा यांच्या अध्यक्षतेखाली नव्या कृती दलाची स्थापना केली आहे.

'एटीएम' मशिनमध्ये बदल करण्यासाठी कृती दलाची स्थापना
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - केंद्र सरकारनं 2000च्या नोटा एटीएममधून सहजगत्या काढता याव्यात, यासाठी संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला असून, आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुद्रा यांच्या अध्यक्षतेखाली नव्या कृती दलाची स्थापना केली आहे. जलद कृती दल कमी वेळेत एटीएमच्या संरचनेत लवकरात लवकर बदल करणार आहे. त्याप्रमाणेच 2000च्या नोटा सोयीस्करपणे निघण्यासाठी देशातील अनेक एटीएम मशिनमध्ये हे बदल केले जाणार आहेत.
दरम्यान, जलद कृती दल एटीएमची संरचना बदलण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. त्यामुळे डेप्युटी गव्हर्नर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांता दास यांनी दिली आहे.
2000च्या नोटा निघण्यासाठी एटीएम मशिनच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये बदल करण्यात येणार आहे. जलद कृती दल हे एटीएमच्या संरचनेत बदल करून नेटवर्क लवकरात लवकर कार्यान्वित करणार आहे. आज किंवा उद्या कृती दलाची एक बैठकही होणार आहे. या जलद कृती दलात 8 सदस्य असून, ते अर्थ मंत्रालय, गृह मंत्रालय आणि बँकेशी निगडीत आहेत.