शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सासू-सासऱ्यांची सेवा हे महिलांचे घटनात्मक कर्तव्य, वेगळे राहणाऱ्या पत्नीची पोटगी रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 08:05 IST

Court: वृद्ध सासू-सासरे किंवा आजी-सासऱ्यांची सेवा करणे ही भारतातील सांस्कृतिक प्रथा आणि महिलांसाठी घटनात्मक बंधन आहे. त्यांच्यापासून वेगळे राहण्याचा पत्नीचा आग्रह अवास्तव असल्याचे सांगत झारखंड उच्च न्यायालयाने वेगळे राहणाऱ्या पत्नीची पोटगी रद्द केली.  

- डॉ. खुशालचंद बाहेतीरांची - वृद्ध सासू-सासरे किंवा आजी-सासऱ्यांची सेवा करणे ही भारतातील सांस्कृतिक प्रथा आणि महिलांसाठी घटनात्मक बंधन आहे. त्यांच्यापासून वेगळे राहण्याचा पत्नीचा आग्रह अवास्तव असल्याचे सांगत झारखंड उच्च न्यायालयाने वेगळे राहणाऱ्या पत्नीची पोटगी रद्द केली.  रुद्र नारायण रे आणि पियाली रे चटर्जी या दाम्पत्यामध्ये वाद सुरू होता.पत्नीला वृद्ध आई आणि आजीची सेवा करणे आवडत नाही. ती वेगळे राहण्यासाठी दबाव टाकते. हे कारण देत पतीने न्यायालयीन विभक्तीचा दावा दाखल केला. न्यायालयाने रुद्र नारायण यांना पत्नीला दरमहा ३० हजार रुपये देण्याचे निर्देश दिले.रुद्र नारायण यांनी याला उच्च न्यायालयात आव्हान दिले. घटनेच्या कलम ५१-अ (एफ) नुसार, सांस्कृतिक वारसा आणि मूल्याचे जतन करणे हे  नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे, असे न्यायालयाने म्हटले.

- पत्नीने वृद्ध सासू-सासऱ्यांची सेवा करणे ही भारतीय संस्कृती असून, या समृद्ध भारतीय संस्कृतीचा वारसा जपणे हे महिलांचे कर्तव्य आहे. पतीने न्यायालयीन विभक्तीसाठी दावा दाखल केला होता, घटस्फोटासाठी नव्हे.-यावरून पतीला पत्नीसोबत राहायचे आहे, पत्नी मात्र कोणतेही वाजवी कारण नसताना वेगळे राहण्यावर ठाम आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले. - पत्नीने आपल्या पतीच्या आईची आणि आजीची सेवा करणे व आपले सासू-सासरे यांच्यापासून वेगळे राहण्याची मागणी अवास्तव होती.- सुभाष चंद, न्यायमूर्ती

विभक्त होण्याचे प्रयत्न ही क्रूरताचउच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या २०१६ मधील एका निर्णयाचा संदर्भ दिला. या निर्णयात पतीला कुटुंबापासून विभक्त होण्यासाठी पत्नीचे सततचे प्रयत्न हे ‘क्रूरतेचे’ कृत्य आहे, असे म्हटले. उच्च न्यायालयाने तिला भरणपोषण देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द केला.

टॅग्स :Courtन्यायालयFamilyपरिवार