शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 18:42 IST

अहमदाबादमधील भीषण विमान अपघाताची दुर्दैवी घटना ताजी असतानाच, केदारनाथजवळून हेलिकॉप्टर अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अहमदाबादमधील भीषण विमान अपघाताची दुर्दैवी घटना ताजी असतानाच, केदारनाथजवळून हेलिकॉप्टर अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अपघातात पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये राजस्थानच्या जयपूर येथील माजी लष्करी अधिकारी राजवीर सिंह चौहान यांचा समावेश आहे. ते या हेलिकॉप्टरचे पायलट होते.

माजी लष्करी अधिकाऱ्याचा दुर्दैवी शेवटमीडिया रिपोर्टनुसार, पायलट राजवीर सिंह चौहान हे भारतीय सैन्यातून निवृत्त झाले होते. त्यांनी तब्बल १५ वर्षे १० महिने देशाची सेवा केली आणि लेफ्टनंट कर्नल पदावरून ते निवृत्त झाले होते. सैन्यात असताना त्यांनी बराच काळ फ्लाइंग ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून काम केले होते. ऑक्टोबर २०२४ पासून ते आर्यन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये पायलट म्हणून कार्यरत होते.

रविवारी सकाळी, राजवीर सिंह चौहान यांचे बेल ४०७ हेलिकॉप्टर उत्तराखंडमधील गौरीकुंडजवळ अपघातग्रस्त झाले. या हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन चौहान यांच्यासह सहा भाविक होते. दुर्दैवाने, या अपघातात सर्वांचा मृत्यू झाला.

शोकाकुल प्रतिक्रिया आणि प्रशासकीय पाऊलेराजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, "केदारनाथजवळ हेलिकॉप्टर अपघातात जयपूरचे रहिवासी पायलट राजवीर सिंह चौहानसह सात जणांचा मृत्यू होणे हे खूप दुःखद आहे. या कठीण काळात शोकग्रस्त कुटुंबांसोबत माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत."

दरम्यान, या अपघातानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली. त्यांनी पुढील दोन दिवस केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या अपघातासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे. या अपघातामुळे केदारनाथ यात्रेतील हेलिकॉप्टर सेवेच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

टॅग्स :AccidentअपघातHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाKedarnathकेदारनाथ