शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Serum नं निश्चित केली Covishield लसीची किंमत; पाहा किती असेल राज्य सरकार, खासगी रुग्णालयांसाठी दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 13:12 IST

Coronavirus Vaccine Price : सीरम इन्स्टिट्यूटनं दिली लसीच्या किंमतीची माहिती. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार लस

ठळक मुद्देसीरम इन्स्टिट्यूटनं दिली लसीच्या किंमतीची माहिती. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार लस

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांत सातत्यानं देशात अडीच लाखांच्या वर रुग्णांची नोंद होत आहे. तर दुसरीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारांनीही कठोर निर्बंध लावण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता कोरोना प्रतिबंधात्मक लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाही उत्पादनाच्या ५० टक्के लसींची विक्री खुल्या बाजारात करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं आपल्या कोविशिल्ड या लसीचे दर निश्चित केले आहेत.भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं आपल्या कोविशिल्ड लसीचे दर निश्चित केले आहेत. राज्य सरकारांना सीरम ही लस ४०० रूपये प्रति डोसच्या हिशोबानं तर खासगी रुग्णालयांना सीरम ही लस ६०० रूपये प्रति डोसच्या हिशोबानं देणार आहे. सीरम इन्स्टीट्यूटनं दिलेल्या माहितीनुसार एकूण लसीच्या उत्पादनाचा ५० टक्के हिस्सा केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी दिला जाणार आहे.  तसंच उर्वरित हिस्सा हा राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना दिला जाईल, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली. 'पुढील दोन महिन्यांमध्ये आम्ही लसींचं उत्पादन वाढवणार असून लसींची कमतरता भरून काढणार आहोत,' अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटकडून देण्यात आली.  पुढील पाच महिन्यांनंतर कोविशिल्ड ही लस रिटेल आणि फ्री ट्रेडमध्ये कोणत्याही ठिकाणी उपलब्ध असेल, असंही कंपनीनं स्पष्ट केलं. दरम्यान, सीरमच्या कोविशिल्ड या लसीचे दर इतर देशांच्या लसीच्या तुलनेत कमी असल्याची माहितीही कंपनीकडून देण्यात आली. अमेरिकेच्या लसीची किंमत भारतीय रूपयांमध्ये १५००, तर रशियन लसीची किंमत ७५० रूपये आणि चिनी लसीची किंमतही ७५० रूपये असल्याचं सीरमनं म्हटलं. 

टॅग्स :Adar Poonawallaअदर पूनावालाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतhospitalहॉस्पिटलCorona vaccineकोरोनाची लस