सराईत गुन्हेगार भीम पगारे याची निघृर्ण हत्त्या टोळीयु्द्धाचा भडका : गोळ्या झाडून शस्त्रानेही वार; सात संशयितांवर गुन्हा

By Admin | Updated: May 11, 2014 00:35 IST2014-05-11T00:35:31+5:302014-05-11T00:35:31+5:30

नाशिक : गेल्या वर्षीच्या चांगले खून प्रकरणानंतर शहरात टोळीयुद्धाचा भडका उडाला असून, यातूनच मल्हारखाण येथील तडीपार व सराईत गुन्हेगार भीम पगारेची शुक्रवारी रात्री एका टोळक्याने भगवती चौकात गोळ्या झाडून, तसेच शस्त्राचे वार करून निर्घृण हत्त्या केली़ या प्रकरणी सात संशयितांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यापैकी दोन संशायितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित पाच फ रार झाल्याचे वृत्त आहे़ या घटनेनंतर संतापलेल्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी गोंधळ घातला, तर काहींनी दुकानदारांना धमकावत दुकाने बंद करण्यास भाग पाडले़

The serial killer Bhim Pagare's fierce assault: The bullets hit the gun; Crime against seven suspects | सराईत गुन्हेगार भीम पगारे याची निघृर्ण हत्त्या टोळीयु्द्धाचा भडका : गोळ्या झाडून शस्त्रानेही वार; सात संशयितांवर गुन्हा

सराईत गुन्हेगार भीम पगारे याची निघृर्ण हत्त्या टोळीयु्द्धाचा भडका : गोळ्या झाडून शस्त्रानेही वार; सात संशयितांवर गुन्हा

तपूर : अंबड इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या नवीन कार्यकारिणीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून, २७ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
आयमाचे सरचिटणीस राजेंद्र अहिरे यांनी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम आज घोषित केला असून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, (दोन जागा), खजिनदार आणि कार्यकारिणी सदस्य १९ जागा अशा २५ जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. १५ ते १८ मे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करणे, २२ मे रोजी माघारीची अंतिम मुदत आणि २७ मे रोजी मतदान, २८ ला मतमोजणी आणि ३० मे रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येणार असून, त्याचवेळी निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात येणार असल्याची माहिती राजेंद्र अहिरे यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: The serial killer Bhim Pagare's fierce assault: The bullets hit the gun; Crime against seven suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.