सेन्सेक्स तेजीच्या ‘ट्रॅक’वरून उतरला
By Admin | Updated: July 9, 2014 01:09 IST2014-07-09T01:09:39+5:302014-07-09T01:09:39+5:30
नरेंद्र मोदी सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प शेअर बाजारात जाण आणू शकला नाही.

सेन्सेक्स तेजीच्या ‘ट्रॅक’वरून उतरला
मुंबई : नरेंद्र मोदी सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प शेअर बाजारात जाण आणू शकला नाही. रेल्वे अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला विक्रमी 26,क्क्क् अंकांवर जाणारा सेन्सेक्स मंगळवारी मात्र 518 अंकांनी आपटला. दुसरीकडे राष्ट्रीय स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीची 164 अंकांनी उतरला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हींचाही ही 1क् महिन्यांतील सर्वात मोठी घसरण आहे.
गेल्या दोन सत्रंत 276.33 अंकांची तेजी नोंदवून 26,क्क्क् अंकाची पातळी गाठणा:या मुंबई शेअर बाजाराच्या 3क् शेअरच्या सेन्सेक्सने नफेखोरीमुळे मंगळवारी 517.97 अंक वा 1.98 टक्क्यांनी ‘ट्रकवरून’ खाली येऊन दिवसअखेर 25,582.11 अंकांवर बंद झाला. तथापि, दिवसभरात याने 26,19क्.44 अंकाच्या विक्रमी पातळीला स्पर्श केला.
यापूर्वी सेन्सेक्समध्ये 3 सप्टेंबर 2क्13 मध्ये 615 अंकाची विक्रमी घट नोंदली गेली होती.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीही नफेखोरीमुळे 163.95 अंक वा 2.11 टक्क्यांच्या घसरणीसह 7,623.2क् अंकांवर आला. तथापि, दिवसभराच्या व्यवहारात 7,8क्क् अंकाची पातळी पार करत एकावेळी 7,8क्8.85 अंकार्पयत ङोपावला होता. गेल्या दोन सत्रंत निफ्टीमध्ये 72 अंकाचा लाभ नोंदला गेला होता.
आज सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी थेट परकीय गुंतवणूक आकर्षिक करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय रोकड संकटाचा सामना करत असलेल्या रेल्वेला सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचा प्रस्तावही यात समाविष्ट आहे. मात्र, रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या अर्थसंकल्पाने बाजाराची निराशा झाल्याचे जाणकारांनी सांगितले.
टाटा अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक अधिकारी रितेश जैन यांनी सांगितले की, ‘अर्थसंकल्प परिचालनाशी संबंधित प्रलंबित योजनांवर केंद्रित आहे. यात या प्रकल्पांच्या कार्यान्वयनावर काहीही तोडगा नाही. कोणत्याही मोठय़ा घोषणोच्या अभावाने शेअर बाजार ‘जमिनीवर’आला.’ सुरुवातीला आघाडीवर असलेल्या रेल्वेशी संबंधित कंपन्यांचे शेअर अखेरीस 2क् टक्क्यांनी खाली आले. टेक्समॅको रेल्वे, टिटागड व्ॉगस, कालिंदी रेल्वे निर्माण आणि कंटेनर कार्प यांच्या शेअरमध्ये घसरण नोंदली गेली.
सेन्सेक्सच्या 3क् शेअरमध्ये 28 मध्ये नुकसान झाले. भेलच्या शेअरमध्ये 8.16 टक्के, एनटीपीसीत 5.36 टक्के, टाटा पॉवरमध्ये 5.क्4 टक्के, कोल इंडियात 4.96 टक्क्यांची घट नोंदली गेली. जवळपास सर्व वर्गातील कंपन्यांच्या शेअरमध्ये नुकसानीची नोंद झाली. बाजारात एकूण 2,234 शेअरमध्ये नुकसान झाले, तर 77क् शेअरमध्ये लाभ नोंदला. गेले काही दिवस सुरू असलेली शेअर बाजारातील तेजी आज थांबली. (प्रतिनिधी)
4 रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही मोठी घोषणा नसल्यामुळे रेल्वे क्षेत्रशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांर्पयत घसरले. मुंबई शेअर बाजारात टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग या कंपनीचा शेअर 19.84 टक्क्यांनी घसरला. बीईएमएलचा शेअर 5 टक्क्यांर्पयत कोसळला.
4 कालिंदी रेल निर्माणचा शेअर 4.99 टक्के, टिटागड वॅगन्सचा शेअर 4.99 टक्के हिंद रेक्टिफायर्सचा शेअर 4.94 टक्के अशी अन्य कंपन्यांची घसरण राहिली. हे शेअर्स गेले काही दिवस उत्तम कामगिरी करीत होते.