सेन्सेक्स 244.48 अंकांनी घसरला
By Admin | Updated: September 16, 2014 01:32 IST2014-09-16T01:32:10+5:302014-09-16T01:32:10+5:30
अमेरिकी फेडरल रिझव्र्हद्वारा व्याजदरात वाढीच्या शक्यतेच्या पाश्र्वभूमीवर आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 244.48 अंकांच्या घसरणीसह 27,क्क्क् अंकाखाली आला.

सेन्सेक्स 244.48 अंकांनी घसरला
मुंबई : चिनी अर्थव्यवस्थेची कमजोर आकडेवारी व अमेरिकी फेडरल रिझव्र्हद्वारा व्याजदरात वाढीच्या शक्यतेच्या पाश्र्वभूमीवर आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 244.48 अंकांच्या घसरणीसह 27,क्क्क् अंकाखाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 63.5क् अंकांनी कोसळून 8,1क्क् अंकांवर आला.
विक्रीच्या दबावात बाजाराचे देशातील महागाईच्या घटलेल्या आकडेवारीकडे दुर्लक्ष झाले. ऑगस्टमध्ये घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाई जवळपास पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली.
ब्रोकर्सनी सांगितले की, डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमजोर होऊन 61.14 प्रतिडॉलरवर आला. यामुळेही बाजार धारणा नकारात्मक झाली. अमेरिकी फेडरल रिझव्र्हद्वारा व्याजदरात वाढ होण्याच्या शक्यतेने जोर धरला. या पाश्र्वभूमीवर बाजारात नफेखोरी झाली. अमेरिकेत व्याजदरांत वाढ झाल्यावर भारतासह अन्य उभरत्या अर्थव्यवस्थांतून भांडवल काढून घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. फेडरल रिझव्र्हची दोनदिवसीय बैठक उद्या सुरू होणार आहे. 3क् शेअर्सचा सेन्सेक्स घसरणीसह उघडला आणि अखेरीस 27,क्क्क् अंकाहून खाली आला. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या घटत्या औद्योगिक उत्पादन आकडेवारीचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.
अखेरीस सेन्सेक्स 244.48 अंक वा क्.9क् टक्क्यांच्या घसरणीसह 26,816.56 अंकावर बंद झाला. 28 ऑगस्टनंतर सेन्सेक्सची ही नीचांकी पातळी आहे. (प्रतिनिधी)
च्तीन दिवसांच्या घसरणीनंतर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात आठवडय़ाच्या सुरुवातीलाच तेजी परतली. जागतिक बाजारातील तेजीच्या पाश्र्वभूमीवर दिल्लीत सोन्याचा भाव 8क् रुपयांनी वधारून प्रति दहा ग्रॅम झाला.
च्बाजारातील जाणकारांनी सांगितले की, जागतिक बाजार सोन्याच्या भावाने आठ महिन्यांचा नीचांक गाठला होता. यात सुधारणा होत असल्याचे संकेत मिळतात स्थानिक बाजार धारणोवर सकारात्मक परिणाम झाला. सिंगापूर सोन्याचा भाव क्.4 टक्क्यांनी वाढून 1,235.क्7 डॉलर प्रतिऔंसवर गेला.