सेन्सेक्स २० महिन्यातील नीचांकी पातळीवर
By Admin | Updated: February 10, 2016 17:06 IST2016-02-10T17:05:14+5:302016-02-10T17:06:39+5:30
सलग तिस-यादिवशी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने २६२ अंकांची घसरण नोंदवून बीएसई सेन्सेक्स २४ हजारांच्या खाली बंद झाला.

सेन्सेक्स २० महिन्यातील नीचांकी पातळीवर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - सलग तिस-यादिवशी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने २६२ अंकांची घसरण नोंदवली. बीएसई सेन्सेक्स २४ हजारांच्या खाली बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ८२ अंकांची घसरण झाली आणि निफ्टी ७२१५ अंकांवर स्थिरावला. मे २०१४ नंतर प्रथमच निफ्टीने २० महिन्यातील नीचांकी पातळी गाठली.
सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली. विशेष करुन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. या तिमाहीत अन्य सरकारी बँकांनी सुमार कामगिरी केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने या तिमाहीतील उत्पनाचे आकडे जाहीर केलेले नाहीत.
पण स्टेट बँकेची कामगिरी देखील निराशाजनक असेल असा भागधारकांचा कयास असल्यामुळे स्टेट बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.