गोव्यातील उद्योग वतरुळात खळबळ

By Admin | Updated: October 28, 2014 02:13 IST2014-10-28T02:13:39+5:302014-10-28T02:13:39+5:30

केंद्राने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रद्वारे, काळा पैसा परदेशातील बँकांमध्ये नेऊन ठेवल्याबद्दल आठ भारतीयांची नावे उघड केली.

Sense of industry in Goa | गोव्यातील उद्योग वतरुळात खळबळ

गोव्यातील उद्योग वतरुळात खळबळ

पणजी : केंद्राने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रद्वारे, काळा पैसा परदेशातील बँकांमध्ये नेऊन ठेवल्याबद्दल आठ भारतीयांची नावे उघड केली. त्यात गोव्यातील मे. तिंबलो प्रा. लि. या खाण कंपनीच्या पाच संचालकांचा समावेश असल्याने येथील उद्योग वतरुळात खळबळ उडाली आहे. 
राधा तिंबलो यांच्या बेकायदा खाण व्यवसायावर शहा आयोगाच्या अहवालात आणि नंतर ‘सीईसी’च्या अहवालातही प्रकाश टाकण्यात आला होता. एका पाकिस्तानी व्यक्तीच्या नावे राधा तिंबलो यांना मायनिंग लिज देण्यात आले होते. पाकिस्तानमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नावे राधा तिंबलो यांच्याकडून गोव्यात खाण चालवली जात होती. तिंबलो प्रा. लिमिटेड, राधा एस. तिंबलो आणि इतरांनी भागिदारी करून केलेल्या कंपनीच्या व्यवहारांवर याआधी शहा आयोगाने बरेच भाष्य केलेले आहे. राधा तिंबलो यांच्या कंपनीवर यापूर्वी प्राप्तीकर खात्याचा छापा पडला आहे. तसेच कार्यालयाची झडतीही घेण्यात आली होती. (खास प्रतिनिधी)
 
4स्वीस बँकेत ठेवलेला काळा पैसा आणि राधा तिंबलो यांचा खाण व्यवसाय यांना पाकिस्तानी कनेक्शनची किनार आहे. मावानी नामक एक व्यक्ती पाकमध्ये स्थलांतरित झाली होती. त्याच्या नावे राधा तिंबलो यांच्याकडे ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’ होती, मात्र त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. दिगंबर कामत यांच्याकडे खाण मंत्रलय असताना तिंबलो यांना लीज नूतनीकरण करून मिळाले.
4गोव्यातील एका खाण व्यावसायिकाचे सिंगापूरमधील बार्कले बँकेत खाते असल्याची जोरदार चर्चा उद्योग वतरुळात सुरू होती. हा व्यावसायिक वारंवार सिंगापूरमध्ये जात असतो. 
 

 

Web Title: Sense of industry in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.