शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅपवर भाजपा आणि संघाचे नियंत्रण, राहुल गांधींचा सनसनाटी आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 20:50 IST

भारतामध्ये फेसबूक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नियंत्रण मिळवले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी एका परदेशी वृत्तपत्रातील लेखाचा संदर्भ देऊन केला आहे.

ठळक मुद्देभारतात फेसबूक आणि व्हॉट्अ‍ॅपवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कब्जा त्या माध्यमातून ते फेक न्यूज आणि द्वेष पसरवतात, निवडणुकीवर प्रभाव पाडतातअखेरीस अमेरिकन प्रसारमाध्यमामधून फेसबूकबाबतचे सत्य समोर आले

नवी दिल्ली - कोरोना विषाणू, चीनची घुसखोरी, देशाची अर्थव्यवस्था यावरून घणाघाती सवाल करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मोदी सरकारची कोंडी केली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी आज भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अजून एक सनसनाटी आरोप केला आहे. भारतामध्ये फेसबूक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नियंत्रण मिळवले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी एका परदेशी वृत्तपत्रातील लेखाचा संदर्भ देऊन केला आहे.काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट करून भाजपा आणि संघावर हा सनसनाटी आरोप केला आहे. त्यात राहुल गांधी म्हणाले की, भारतात फेसबूक आणि व्हॉट्अ‍ॅपवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कब्जा केला आहे. त्या माध्यमातून ते फेक न्यूज आणि द्वेष पसरवत आहेत. तसेच निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठीही त्याचा वापर त्यांच्याकडून होतो. अखेरीस अमेरिकन प्रसारमाध्यमामधून फेसबूकबाबतचे सत्य समोर आले, असा दावा त्यांनी वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्रातील लेखाच्या हवाल्याने केला.

भारतातील सत्ताधारी भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून होणारी द्वेषपूर्ण भाषा आणि आक्षेपार्ह वक्तव्यांबाबत फेसबूककडून मवाळ भूमिका घेतली जाते, असे वॉल स्ट्रीट जर्नलमधील लेखात म्हटले होते. तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केल्यास कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, असेही एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने या लेखात म्हटले होते.दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या या आरोपांना भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधींच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, निवडणुकीपूर्वी डेटाला हत्यार बनवताना राहुल गांधीच रंगेहात पकडले गेले होते. केंब्रिज अ‍ॅनॅलिटिका, फेसबूकशी असलेली भागिदारी पकडी गेली होती, असे लोक आज बेशरमपणे प्रश्न विचारत आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस