गाव पातळीवर ज्येष्ठांची फिल्डींग
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:09+5:302015-02-14T23:51:09+5:30
शेवगाव : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी गावागावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाच्या प्रतिनिधींच्या ठरावाच्या बैठकामुळे तालुक्याच्या ग्रामीण परिसरातील राजकारण ढवळून निघाले आहे. आपल्या कर समर्थकाच्या नावाचा ठराव पारीत व्हावा यासाठी प्रमुख नेते मंडळीबरोबरच गावपातळीवरील ज्येष्ठांनी जोरदार फिल्डींग लावली आहे.

गाव पातळीवर ज्येष्ठांची फिल्डींग
श वगाव : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी गावागावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाच्या प्रतिनिधींच्या ठरावाच्या बैठकामुळे तालुक्याच्या ग्रामीण परिसरातील राजकारण ढवळून निघाले आहे. आपल्या कट्टर समर्थकाच्या नावाचा ठराव पारीत व्हावा यासाठी प्रमुख नेते मंडळीबरोबरच गावपातळीवरील ज्येष्ठांनी जोरदार फिल्डींग लावली आहे.जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्थाचा मतदानासाठी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या नावाचा प्रस्ताव दि. २० फेब्रुवारीपर्यंत सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर करावयाचा असल्यामुळे गेल्या काही दिवसापासून गावागावातील सहकारी संस्थाच्या विशेष बैठका सुरू आहेत. शेवगाव तालुक्यात ७४ विविध कार्यकारी सेवा संस्था तसेच ५ पतसंस्था व २० मजूर संस्था असून, यापैकी बालमटाकळी संस्थेवर सध्या प्रशासक असल्याने व आखेगाव सेवा सहकारी संस्था दोन वर्षापूर्वी विसर्जित झालेली असल्याचे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी ७२ सेवा सहकारी संस्था, ३ पतसंस्था व ४ मजूर संस्था पात्र असून, वरील संस्थांचे ठराव सहाय्यक निबंधक कार्यालयात दाखल होणार आहेत. यापैकी आतापर्यंत १० संस्थांचे ठराव दाखल झाल्याची माहिती सहाय्यक निबंधक ए.आर. पुरी यांनी दिली.तालुक्यातील दहिगाव, बालमटाकळी, कानबी, आखतवाडे, चेडेचांदगाव, चापडगाव, नजिकबाभुळगाव, वडुले बु।।, ढोरजळगाव, एरंडगाव, बेलगाव, भातकुडगाव, देवटाकळी, निंबेनांदूर, वाघोली, खामपिंप्री, भायगाव, हिंगणगावने, अंतरलवाली बु।।, जोहरापूर, गा. जळगाव, कोळगाव, कर्हेटाकळी, खडके-मडके, मजलेशहर, खामगाव, खाणापूर व विजयपूर अशा तालुक्यातील ३१ संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. तसेच लखमापुरी, सोनविहिर, ठा. पिंपळगाव व शेवगाव यापाच संस्थांनी निवडणूक यापूर्वीच बिनविरोध पार पडलेली आहे. ज्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे त्यांचा विद्यमान संचालक मंडळाचा ठराव अपेक्षित असल्याने दि. २० फेब्रुवारीपर्यंत कोणत्या नावाचे ठराव दाखल होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.(अपूर्ण......)