शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 5:20 AM

Motilal Vora :

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचे सोमवारी निधन झाले. त्यांचे वय ९३ वर्षांचे होते. फुप्फुस व मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या त्रासामुळे त्यांच्यावर दिल्लीतील एस्कॉर्ट्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मोतीलाल व्होरा यांच्या पार्थिवावर छत्तीसगढमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. 

मोतीलाल व्होरा यांना ऑक्टोबरमध्ये कोरोनाची बाधा झाली होती. त्यातून ते बरे झाले होते. १९ डिसेंबरला त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा रविवारी ९३वा वाढदिवस होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे निधन झाले. मोतीलाल व्होरा यांचा जन्म २० डिसेंबर १९२७ रोजी झाला. मोतीलाल व्होरा यांनी काही हिंदी व इंग्रजी दैनिकांमध्ये पत्रकारिताही केली होती.

काँग्रेस पक्षाचे खजिनदार म्हणून त्यांनी सुमारे दोन दशके काम पाहिले. उत्तर प्रदेशचे राज्यपालपदही त्यांनी भूषविले होते. त्यानंतर काँग्रेस पक्षातील प्रशासकीय बाबींचे सरचिटणीस म्हणून मोतीलाल व्होरा यांची निवड करण्यात आली. ते गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते.  

अफाट संघटन कौशल्य असलेले नेता : मोदीज्येष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांच्याकडे अफाट प्रशासकीय व संघटन कौशल्य होते. त्यांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्द सर्वांच्याच लक्षात राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.  काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, मोतीलाल व्होरा हे काँग्रेसचे सच्चे अनुयायी व दिलदार व्यक्ती होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रियांका गांधी यांनीही मोतीलाल व्होरा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस