शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कर्ण सिंह यांचा कलम ३७० हटवण्यास पाठिंबा, म्हणाले निर्णयाला विरोध करणे चुकीचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 17:50 IST

कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत काँग्रेसमध्ये दुमत निर्माण झाल्याचे चित्र दिसत असून, अनेक काँग्रेस नेते पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात मतप्रदर्शन करत आहेत.

नवी दिल्ली - कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत काँग्रेसमध्ये दुमत निर्माण झाल्याचे चित्र दिसत असून, अनेक काँग्रेस नेते पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात मतप्रदर्शन करत आहेत. दरम्यान, काश्मिरच्या भारतातील विनीकरणावर स्वाक्षरी करणारे राजा हरी सिंह यांचे पुत्र आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कर्ण सिंह यांनी कलम ३७० बाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला समर्थन दिले आहे. या निर्णयासाठी केंद्र सरकारवर पूर्णपणे टीका करणे योग्य ठरणार नाही, असे कर्ण सिंह यांनी म्हटले आहे.  कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाबाबत भाष्य करताना कर्ण सिंह म्हणाले की, ''या निर्णयाला सरसकट चुकीचा ठरवणे योग्य ठरणार नाही. या निर्णयामध्ये अनेक सकारात्मक पैलू आहेत. संसदेत अगदी वेगवान हालचाली करून घेतलेल्या निर्णयामुळे आम्हा सर्वांना धक्का बसला आहे.''  या निर्णयाबाबत देशभरामधून उमटत असलेल्या प्रतिक्रियांबाबत ते म्हणाले की,''केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाला जम्मू आणि लडाखसह संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळाला आहे. मी या परिस्थितीबाबत खूप विचार केला आहे. वैयक्तिक पातळीवर मी या निर्णयाला पूर्णपणे विरोध करण्याशी सहमत नाही. यामध्ये अनेक सकारात्मक पैलू आहेत. लडाखला केंद्रशासित करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. खरंतर काश्मीर रियासतीचा सदर ए रियासत असताना १९६५ मध्ये मी हा सल्ला दिला होता.''

 केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यासंदर्भातील कलम ३७० मधील अनेक तरतुदी संपुष्टात आणल्या आहेत.तसेच जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन करूव जम्मू -काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याचे विधेयकही संसदेत मंजूर झाले आहे. 

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेस