ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अनिल सरकार यांचे निधन
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:32+5:302015-02-11T00:33:32+5:30
अगरतळा : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि राज्य नियोजन परिषदेचे उपाध्यक्ष अनिल सरकार यांचे काल सोमवारी रात्री दीर्घआजाराने निधन झाले़ ते ७६ वर्षांचे होते़

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अनिल सरकार यांचे निधन
अ रतळा : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि राज्य नियोजन परिषदेचे उपाध्यक्ष अनिल सरकार यांचे काल सोमवारी रात्री दीर्घआजाराने निधन झाले़ ते ७६ वर्षांचे होते़मधुमेह, हृदयरोग आणि मूत्रपिंडाच्या आजाराने ते ग्रस्त होते़ दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते़ त्रिपुरा सरकारने त्यांच्या सन्मानार्थ आज मंगळवारी सुटी जाहीर केली़ गतवर्षी सरकार यांच्या पत्नीचे निधन झाले होते़ तेव्हापासून अनिल सरकार आजारी होते़ किडनी, हृदयासंबंधित आजारांनी ते ग्रस्त होते़ विद्यमान आमदार असलेले सरकार १९७२ पासून सलग २५ वर्षे मंत्री राहिले़ सलग आठ वेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते़ एक जागतिक ख्यातीचे कवी अशीही त्यांची ओळख होती़ त्यांनी अनेक कविता आणि कथा लिहिल्या़