्रज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर (सीएनएक्स)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2015 22:09 IST2015-08-20T22:09:51+5:302015-08-20T22:09:51+5:30

कर्णिकनगर येथील आधार ज्येष्ठ नागरिक व युवा संघ आणि माधवबाग साने केअर विजापूर यांच्या वतीने हृदयरोग व सर्वरोग निदान आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. कर्णिकनगर येथे पत्राशेड येथे शिबीर झाले. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपमहापौर प्रवीण डोंगरे होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक सोलापूर समन्वय समितीचे शास्त्रीनाथ सावंत, कर्णिकनगरचे चेअरमन प्रा. काजळे उपस्थित होते. प्रारंभी संघाचे सचिव रामचंद्र माने यांनी प्रास्ताविक केले. संघाचे अध्यक्ष महादेव माने यांनी सत्कार केला. माधवबागचे डॉ. शलाका पाटील यांचे व्याख्यान झाले. हृदयरोग, त्यावरील आयुर्वेदिक उपचार, व्यायाम चालणे, अँजिओप्लास्टी, ऑपरेशनविषयी माहिती दिली. या शिबिरात कर्णिकनगर, एकतानगर, यल्लालिंगमठ परिसरातील १०० नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरासा

Senior Citizens Health Camp (CNX) | ्रज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर (सीएनएक्स)

्रज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर (सीएनएक्स)

्णिकनगर येथील आधार ज्येष्ठ नागरिक व युवा संघ आणि माधवबाग साने केअर विजापूर यांच्या वतीने हृदयरोग व सर्वरोग निदान आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. कर्णिकनगर येथे पत्राशेड येथे शिबीर झाले. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपमहापौर प्रवीण डोंगरे होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक सोलापूर समन्वय समितीचे शास्त्रीनाथ सावंत, कर्णिकनगरचे चेअरमन प्रा. काजळे उपस्थित होते. प्रारंभी संघाचे सचिव रामचंद्र माने यांनी प्रास्ताविक केले. संघाचे अध्यक्ष महादेव माने यांनी सत्कार केला. माधवबागचे डॉ. शलाका पाटील यांचे व्याख्यान झाले. हृदयरोग, त्यावरील आयुर्वेदिक उपचार, व्यायाम चालणे, अँजिओप्लास्टी, ऑपरेशनविषयी माहिती दिली. या शिबिरात कर्णिकनगर, एकतानगर, यल्लालिंगमठ परिसरातील १०० नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरासाठी उपाध्यक्ष आर. जी. पाटील, कोषाध्यक्ष विजयकुमार काटवे, ग्रंथपाल मिसालोलू, गायकवाड, बापूराव मोरे, चोरमुले, कुलकर्णी यांनी प्रयत्न केले.

Web Title: Senior Citizens Health Camp (CNX)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.