शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपातील लोक सर्वात जास्त भयभीत, यशवंत सिन्हा यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 11:03 IST

आज देशातील परिस्थिती ७० वर्षांपूर्वी गांधीजींच्या हत्येच्या वेळी होती तितकीच भीषण आहे व लोकशाही संस्था धोक्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली-  केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करून देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर राजकारण बाजूला ठेवून विचारमंथन करण्यासाठी भाजपाचे नाराज ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मंगळवारी ‘राष्ट्रमंच’ या व्यासपीठाची औपचारिक स्थापना केली. यावेळी यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली आहे. आज देशातील परिस्थिती ७० वर्षांपूर्वी गांधीजींच्या हत्येच्या वेळी होती तितकीच भीषण आहे व लोकशाही संस्था धोक्यात आल्या आहेत, असा आरोप करून यशवंत सिन्हा यांना केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. ‘भाजपामध्ये आज सर्वजण भयभीत आहेत, पण आम्ही त्या भयाला जुमानत नाही’, असंही ते म्हणाले. 

देशात संवाद आणि चर्चा, असभ्य, एकाबाजूची आणि भयानक झाली आहे. गर्दीचं काम प्रकरणांना न्याय देण्याचं झालं आहे, असं दिसायला लागलं आहे, असंही यशवंत सिन्हा यांनी म्हंटलं. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना लावून धरणं, हे माझ्या संघटनेचा मुख्य हेतू असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मी तयार केलेली संघटना कुठल्याही पक्षाच्या विरोधात नसेल तर ती राष्ट्रीय मुद्यांवर जोर देण्याची कारवाई करेल, असा दावाही यशवंत सिन्हा यांनी केला. 

दरम्यान, भाजपाचे आणखी एक नाराज खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याखेरीज दिनेश त्रिवेदी (तृणमूल काँग्रेस), रेणुका चौधरी (काँग्रेस), माजीद मेमन (राष्ट्रवादी) व संजय सिंग (आम आदमी) या खासदारांसह सोमपाल व हरमोहन धवन हे माजी केंद्रीय मंत्री, गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता आणि लोकदलाचे जयंत चौधरी हे या मंचात सहभागी झाले होते. पक्षात मोकळेपणाने मतं मांडता येत नाहीत, म्हणून आपण या मंचावर आलो. पण असं करणं पक्षविरोधी नाही, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हंटलं. 

टॅग्स :BJPभाजपाYashwant Sinhaयशवंत सिन्हाShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हा